मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप, या जिल्ह्यात शिंदे महाविकास आघाडीसोबत जाणार? भाजपला मोठा धक्का

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप, या जिल्ह्यात शिंदे महाविकास आघाडीसोबत जाणार? भाजपला मोठा धक्का
eknath shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 7:23 PM

सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा तिढा कायम आहे. मात्र भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत महाविका आघाडीची बैठक झाली असून,  राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत आता महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट अशी नवी आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तसे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देखील देण्यात आले आहेत.

सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा कायम आहे, जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपानं महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला गृहीत धरून मॅजिक फिगर 31 असल्याने सत्तेचा दावा केला आहे,  त्यामुळे महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल,असं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट देखील करण्यात आलं आहे.

मात्र दुसरीकडे सांगली जिल्हा परिषदेमध्ये वेगळचं चित्र पहायला मिळत आहे. भाजपला सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गट देखील प्रयत्नशिल असल्याची माहिती समोर येत आहे. तशा दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीच्या सत्तेचं समिकरण 

भाजपा 11, शिवसेना शिंदे गट 07,  राष्ट्रवादी अजित पवार गट 06, जनसुराज्य शक्ती पक्ष 01 आणि रयत क्रांती संघटना 01, हे सर्व सदस्य मिळून 31 चा आकडा गाठला जात आहे, मात्र अजित पवार गट  आणि शिवसेना शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार का? असा प्रश्न आहे.

तर दुसरीकडे  राष्ट्रवादी शरद पवार गट 18, काँग्रेस 11, शिवसेना ठाकरे गट  01, राष्ट्रवादी अजित पवार गट 06 आणि शिवसेना शिंदे गट 07  अशी एकूण सदस्यांची संख्या ही 43 वर पोहोचत आहे. त्यामुळे आता निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.