AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, केली सर्वात मोठी घोषणा, लोकसभेसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला

ऑपरेशन टायगरनंतर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यता आली आहे.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, केली सर्वात मोठी घोषणा, लोकसभेसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 5:47 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली त्या-त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे, या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांची पहिला सभा बंडखोर सासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये मुंबईत झाली होती.

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा ही वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघात पार पडली आहे, यावेळी बोलताना त्यांनी वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी या मतदारसंघातून 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी दौऱ्यावला निघालो आहे, काहीजण म्हणाले उद्धव ठाकरे फिरत नाही, म्हणून म्हणालो आता दाखवतो खरी शिवसेना काय आहे ते? शिवसेना कुठेही गेलेली नाही, शिवसौनिक जिथे आहेत, तिथेच आहेत. परंतु आता आपल्याला गद्दारीला थारा द्यायचा नाही, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर केला आहे. शिवसेना ठाकरे गटातून ज्या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामध्ये संजय देशमुख यांचा देखील समावेश आहे. दरम्यान त्यापूर्वी शुक्रवारी मुंबईवरून नागपूरला येताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता, या विमान प्रवासाची चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत