
काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणूक निकालामध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गट राज्यात क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं भाजपसोबत युती केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती पहायला मिळाली, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला चांगलं यश मिळालं, स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपला या महापालिकेत 89 जागा मिळाल्या तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं मनसेसोबत युती केली होती. या महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही.
दरम्यान त्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, येत्या पाच तारखेला मतदान आहे, तर सात तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. सोलापूर जिल्हातल्या बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे. भाजपच्या पॅनलविरोधात हे चारही पक्ष एकत्र आल्यानं आता भाजप समोरील आव्हान मोठं असणार आहे. माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार करण्यात आलं आहे.
दोन राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणानंतर आता याठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट देखील एकत्र आले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही एक वेगळी युती तयार करण्यात आली आहे. या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या माढ्यातील रांझणी येथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, या मतदारसंघात सर्वच पक्ष भाजपाविरोधात एकवट्यानं, या ठिकाणी विजय मिळवताना भाजपचा कसं लागणार आहे.