AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी काही म्हणा, शिवराज्याभिषेक सोहळा 6 जूनलाच थाटात होणार, भिडे गुरुजींना समिती सदस्याचा टोला

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून रोजी झालेला आहे. त्यामुळे या तारखेलाच हा सोहळा होणार आहे. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीपेक्षा वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाची उंची जास्त असली पाहिजे का? त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी म्हटले.

कोणी काही म्हणा, शिवराज्याभिषेक सोहळा 6 जूनलाच थाटात होणार, भिडे गुरुजींना समिती सदस्याचा टोला
Shivrajyabhishek
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 25, 2025 | 9:29 AM
Share

रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा केला जातो. परंतु ही पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असे वक्तव्य नुकतेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले होते. त्यांना शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. भिडे गुरुजी ज्येष्ठ आहे, मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ? असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे, असे गंगाधर काळकुटे यांनी सांगत ६ जून रोजीच शिवराज्याभिषक सोहळा होणार असल्याचे सांगितले.

शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी सांगितले की, यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरातून गावागावातून उत्साहाने मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमी जमाणार आहेत. ६ जूनलाच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे या तारखेलाच हा सोहळा होणार आहे.

जरी कोणी काहीही म्हणत असेल सोहळा रद्द केला पाहिजे किंवा काही…पण सोहळा तारखेनुसारच होईल, असे गंगाधर काळकुटे यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदाही लाखोच्या संख्येने शिवभक्त गडावर येणार आहेत. भिडे गुरुजी ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ?, असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. शिवभक्त आणि महाराष्ट्रातील रणरागिणी बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवून या वक्तव्याचा निषेध करतील, असे त्यांनी म्हटले.

वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरही काळकुटे यांनी आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीपेक्षा वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाची उंची जास्त असली पाहिजे का? त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे. वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात आम्ही कुठेही इतिहासात वाचलेले नाही. वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवायचे की नाही, हा वाद निरर्थक आहेत. त्यासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमावी. त्या समितीने वाघ्या कुत्र्याचे शिल्प काल्पनिक असेल, असा निष्कर्ष काढला तर ती काढली पाहिजे. तसेच वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढायचे नसेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पायथ्याला असली पाहिजे. महाराजांच्या समाधी पेक्षा जास्त उंची म्हणजे शिवाजी महाराजांचा एक अपमान आहे, असे शिवभक्तांना वाटते, असे गंगाधर काळकुटे यांनी म्हटले.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...