AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिंधे गटाने फक्त गद्दारांना नोकरी दिली, पण आम्ही… ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित करताना उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

राज्यातील बेकारी तर हटवली पाहिजे पण आत्ताचं मिंधे सरकार आहे, त्यांच्या कारभारात याबद्दल काहीच तरतूद दिसत नाहीये. त्यांनी फक्त गद्दारांना नोकरी दिली, बाकीच्या जनतेला काहीच दिलं नाही. उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात अनेक प्रमुख घोषणा करण्यात आल्या आहेत.

मिंधे गटाने फक्त गद्दारांना नोकरी दिली, पण आम्ही... ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित करताना उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित
| Updated on: Nov 07, 2024 | 10:40 AM
Share

राज्यातील बेकारी तर हटवली पाहिजे पण आत्ताचं मिंधे सरकार आहे, त्यांच्या कारभारात याबद्दल काहीच तरतूद दिसत नाहीये. त्यांनी फक्त गद्दारांना नोकरी दिली, बाकीच्या जनतेला काहीच दिलं नाही. पण आम्ही महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना, मुल-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. मुंबईतील पळवलेले वित्त केंद्र धारावीत ऊभारू असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. काल पंचसूत्री जाहीर केली, लवकरच मविआचा जाहीरनामा प्रकाशित होईल, असे ते म्हणाले.

आपल्या राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय, ही चांगली गोष्ट आहे. पण आमचं सरकार आल्यावर आम्ही मुलांनाही मोफत शिक्षण देणार असं वचनही दिलं आहे. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार हे वचनही वचननाम्यात असल्याचं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुटुंबप्रमुखांचा वचननामा

संस्कार

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मठ, देऊळ आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.

•अन्नसुरक्षा

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव दोन वर्षे स्थिर ठेवणार.

•महिला

महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार. प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर स्वतंत्र २४x७ महिला पोलीस चौकी सुरू करणार. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.

•आरोग्य

प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.

शिक्षण

जात-पात-धर्म-पंथ न पाहता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुक्कामांगे मोफत शिक्षण देणार.

पेन्शन

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार.

शेतकरी

विक्रमी ५० हजार कोटींचे पॅकेज देऊन पिकाला हमीभाव देणार.

• वंचित समूह

वंचित समूहाला सक्षम व स्वावलंबी बनवणार.

मुंबई

स्थानिकांना त्याच्या उद्योगात सर्वोच्च रहावे तर तशा निती ठेवणार. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देईन व अधिकचे औद्योगिक केंद्र उभारणार.

उद्योग

बाह्य देशांना विनाकारण प्रवेश न देणारे. गिरणी कामगार संरक्षणासह मिलर्सच्या जवळच पर्यावरणासहित उद्योगाच्या साधनांना पर्यावरणासहित योग्य निर्णय घेणार.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.