AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही”, शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याचे विधान

"आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर आदित्य काय त्याच्या बापाने उद्धवने दापोलीतून उभे राहून दाखवावे"

...ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही, शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याचे विधान
| Updated on: Sep 30, 2024 | 9:08 AM
Share

Ramdas Kadam Criticised Thackeray Family : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. येत्या विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष रंगणार आहे. त्यातच आता महायुतीतील शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे” असे विधान शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले आहे.

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतंच खेडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “शिवसेना आम्ही मोठी केली. कालचं पिल्लू याला काय माहिती”, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

“आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला एका कवडीची पण किंमत देत नाही. आदित्य ठाकरे यांचं योगदान काय आहे. शिवसेना आम्ही मोठी केली. कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. कालच पिल्लू याला काय माहिती”, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

“आदित्य ठाकरे बेईमान आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही. राजकारणातून आमचं खानदान उद्धवस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत होते. आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर आदित्य काय त्याच्या बापाने उद्धवने दापोलीतून उभे राहून दाखवावे”, असे चॅलेंजही रामदास कदम यांनी दिले.

“नारायण राणे जेव्हा पक्षातून बाहेर पडले. तेव्हा हाच उद्धव ठाकरे मला पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हता. ज्या सापाला दूध पाजलं तो अंगावर येतोय, त्याचा फणा कसा ठेचायचा हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही कुणाच्या अंगावर येताय याचं भान ठेवा”, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.