AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या विधानावरुन शिवसेना मंत्र्याचा युटर्न, म्हणाले “आता दोन्ही शिवसेना…”

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरु आहे. सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या विधानावरुन शिवसेना मंत्र्याचा युटर्न, म्हणाले आता दोन्ही शिवसेना...
| Updated on: Feb 01, 2025 | 4:00 PM
Share

Sanjay Shirsat On Shivsena alliances :   राज्याच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरु आहे. सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदेंच्या गटातील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केले आहे. “मला संधी मिळाली तर मी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार”, असे संजय शिरसाट म्हणाले होते. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा भूकंप होणार का अशी चर्चा रंगली होती. आता यावरुन संजय शिरसाट यांनी युटर्न घेतला आहे.

संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दोन्हीही शिवसेना एकत्र येण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले काल मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी प्रयत्न करतो असे समजण्याचा काहीच कारण नाही. मी कोणता विद्वान आहे त्यांना सांगायला. मी काही वेगळे प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. भविष्यात जे घडेल त्याचा आनंदच आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते

“उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता. सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता. एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा राग होता. येणारी महापालिका निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झाली आहे. पण आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे कान भरण्यात आले

“ते एकत्र आले तर हरकत नाही. मात्र आता हे एकत्र येणार नाही. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा, हे अनबॅलेंस झाले आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी हे एकत्र येणार नाहीत. आता अशी अवस्था आहे की काँग्रेस जी सत्तेत होती, त्यांचा साधा फोन देखील यांना नाही. यांना स्वतःच म्हणणारे आता कोणताही पक्ष नाही. उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले होते. आम्ही ८ ते १० जण नाराज आहे, त्यांना जाऊ द्या, मात्र जेव्हा उठाव झाला, तेव्हा कळाले की हे 40 जण होते”, असेही संजय शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना सुधारायला देणार नाही

“गेले 25 वर्षे युतीत सडले हे म्हणाले. मात्र अडीच वर्ष ज्यांच्या सोबत काढले त्यांनी किती त्रास दिला, हे सांगत नाही. त्यांच्याकडे एवढे रथी महारथी आहेत. त्यांच्याकडे विद्वानांची गँग आहे. ही उद्धव ठाकरे यांना सुधारायला देणार नाही. मी गंगाधर गाडे यांनी घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता. ते चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झाले आहे”, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...