AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचुक यांना पुढे करून सगळ्या गोष्टी सुरू होत्या; श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सोनम वांगचुक यांना पुढे करून सगळ्या गोष्टी सुरू होत्या; श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
| Updated on: Jul 19, 2026 | 11:27 AM
Share

दिल्लीतील जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर 20 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण वांगचुक यांना सोडावं लागलं. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर विरोधकांनी बोट ठेवलं. विरोधकांनी केलेल्या आरोपाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनम वांगचुक यांना पुढे करून सगळ्या गोष्टी सुरू होत्या, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

जंतर-मंतर आंदोलनावरील कारवाईवरून विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा दिल्लीतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘सोनम वांगचुक यांना पुढे करून काही करण्याचा प्रयत्न करत होते. ते 20 दिवसांपासून उपोषण करत होते. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले’. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर म्हणाले, ‘तुम्ही भूतकाळात गेलात. तर युपीएच्या सरकारच्या काळात किती पेपर फुटले. किती भ्रष्टाचार झाले. मोदी सरकारवर कोणतेच भ्रष्टाचार झाल्याचे आरोप नाहीत म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे’

मतदारसंघाची पुनर्रचना विधेयकावर ते म्हणाले, ‘आम्ही सर्व चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार आहोत. विधेयकात बदल सुचवण्याचेही मागच्या वेळी अमित शहा यांनी सांगितले होते’. तर केंद्रातही शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचे त्यांनी सांगितले. ‘केंद्रात एनडीएची ताकद वाढली आहे. आमचेही 13 खासदार झाले आहेत. आमच्या खासदारांना संधी मिळेल. मीही अनुभव घेतला आहे. आमच्या लोकांना नेहमी संधी मिळणार आहे. आमचे सर्व खासदार बोलणार , असेही त्यांनी सांगितले.

खासदारांच्या विलिनीकरणावर शिंदे काय म्हणाले?

काल फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला परवानगी मिळाली. यावर शिंदे म्हणाले, ‘सर्व तांत्रिक विषय आहे. अध्यक्षांनी सर्व विचार करूनच निर्णय घेतला असणार आहे’. तर डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केले. ‘कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही आधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे, असे शिंदे यांनीं सांगितले.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...