AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | ‘दानवे तुम्ही सीडी काढा, XXX काढा’, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ नंतर कोणाला दिला इशारा?

Kirit Somaiya | "किरीट सोमय्या यांच्याबाबत कुठल्याही महिलेने कुठलीही तक्रार केलेली नाहीये. त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचा आमचा थेट आरोप आहे"

Kirit Somaiya | 'दानवे तुम्ही सीडी काढा, XXX काढा', किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ नंतर कोणाला दिला इशारा?
Kirit Somaiya
| Edited By: | Updated on: Jul 18, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांच्या कथित व्हिडिओवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. भास्कर जाधव यांनी सोमय्यांना क्लीन चीट देणार का? म्हणून थेट देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे.

राज्याच्या राजकारणात या कथित सीडीवरुन आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने किरीट सोमय्या यांची बाजू घेतली आहे.

शिवसेनेने घेतली किरीट सोमय्यांची बाजू

“किरीट सोमय्या यांच्याबाबत कुठल्याही महिलेने कुठलीही तक्रार केलेली नाहीये. त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचा आमचा थेट आरोप आहे. कुठल्या महिलेचा त्यावर काही आक्षेप नाहीये कुठली तक्रार प्राप्त नाहीये. केवळ आणि केवळ त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आहे, हे स्पष्टपणे पाहायला मिळते. कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याची गरज नाहीये” असं संजय शिरसाठ म्हणाले. ते शिवसेनेच प्रवक्ते आहेत.

संजय शिरसाठ काय म्हणाले?

“ज्याने कोणी हे सगळं काम केलेलं आहे. त्या सगळ्यांना आमचं एवढच म्हणणं आहे की, बाबा तुम्ही सावध राहा. भविष्यामध्ये तुमच्या सीडी येऊ शकतात. ठाकरे गटाला मला सावध करायचं आहे. त्यांनी आता संभाळून राहावं, त्यांचाही नंबर लागू शकतो. दानवे तुम्ही हीच कामे करा, सीडी काढा, XXX काढा” असं संजय शिरसाठ म्हणाले. “धारावी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्यात लोकांना फायदा होईल. लोकहीताचा निर्णय घेतला जाईल., कितीही खोके बोके करा, सरकार स्थिर आहे. विरोधकांना कामधंदे नाहीत” अशी टीका संजय शिरसाठी यांनी केली.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?