AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyoti Waghmare : शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचा उद्धव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागणारा वार

Jyoti Waghmare : "महाराष्ट्र अतिवृष्टीशी झुंजतोय. पुरामुळे उध्वस्त झालेत. अहिल्यानगरमध्ये त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषण करू नये. आधीच अस्मानी संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्रला ह्या सभेनंतर काही झालं तर परवडणारे नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून संवेदनशील पणे वागण्याची अपेक्षा करतोय" असं शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या.

Jyoti Waghmare : शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचा उद्धव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागणारा वार
Jyoti Waghmare
| Updated on: Sep 30, 2025 | 12:42 PM
Share

“शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा पंढरपूर वारीसारखा आहे. अतिवृष्टी झाली त्यामुळेच मोठं नुकसान झालं आहे. पण तरीही स्फुरण घेण्यासाठी शिवसैनिक मुंबईला येतील. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व खालची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. संपत्तीचे वारसदार खूप असतील पण विचाराचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत. आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा” अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

“दसरा मेळाव्यात विचार मांडले जायचे. पण उबाठाचा मेळावा म्हणजे पीजे मारतात. त्यामुळे त्यांनी दसरा मेळावा साजरा करावा. मनसेचे नेते म्हणतात मुंबईचा महापौर हा मनसेचा होईल, तेव्हा राऊत काहीही बोलले नाहीत. भाऊ एकत्रित येतायत ठीक आहे, पण ते वेगळे का झाले? यावर राऊत बोलत नाहीत” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

उद्या दाऊदला ही बोलावतील

“राऊत यांची गाडी का फोडली होती?. संजय राऊत यांनी त्यांचा मेळावा दिल्लीला घ्यावा. त्यांचे हायकमांड दिल्लीमध्ये आहे. एका विमानात बसतील एवढेच लोकं राहिलेले आहेत, त्यांनी सोनिया गांधीच्या अंगणात जाऊन मेळावा घ्यावा. उबाठाच्या मेळाव्यात मुसा का कोण तो दहशतवादी होता, तो प्रवक्ता आहे त्याला बोलवणार का? उद्या दाऊदला ही बोलावतील” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

ही सुलतानी वसुली थांबवू

“धर्माच्या आधारावर मतं राजकारण करण्याशिवाय ओविसी यांनी काय केलं?. पूर बाधित क्षेत्रात अत्यंत वाईट अवस्था आहे. महिला माझ्या गळ्यात पडून रडतायत. बँकेच्या नोटीस येतं असतील तर त्या बंद झाल्या पाहिजेत. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या बाबतीत सांगून ही सुलतानी वसुली थांबवू.पूरग्रस्त भागात गेल्यानंतर लोकांच्या व्यथा ऐकून मी व्यथित झाले. मी राजकीय नेता नसते सामान्य असते तरी तेच केलं असतं” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

प्रशासनावर दबाव आहे मान्य आहे

“मी अशा ट्रोलिंगला भीक घालत नाही. आम्ही मान्य करतो जिल्हाधिकारी हुशार आहेत पण त्यांनी संवेदनशील पणे वागावं. प्रशासनावर दबाव आहे मान्य आहे, पण आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडतोय. जर असं करताना अनेक वेळा टीका झाली तरी मला फरक पडतं नाही” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.