Shivsena Supreme Court Hearing Updates : ती तारीख महत्वाची, सिब्बल यांनी मांडला जबरदस्त पॉइंट, शिवसेना खटल्याच्या सुनावणीतले 10 महत्वाचे मुद्दे
Shivsena Supreme Court Hearing Updates : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे. या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. याआधी एकनाथ शिंदे शिवसेनेचे वकिल नीरज किशन कौल युक्तीवाद करत होते. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद संपला होता. पण आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिवसेना कोणाची याच्या फैसल्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कारण या खटल्याचा निकाल भविष्यातील राजकीय पक्षांच्या फुटींमध्ये महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं ते जाणून घेऊया.
कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत मांडलेले मुद्दे
1) अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे. अध्यक्षांचे अधिकार काय आहेत ? विधानसभा अध्यक्षांचं कार्यक्षेत्र काय आहे? त्यांचा संविधांनाशी काही संबंध नाही. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत.
2) आम्हाला कोर्टात यावं लागेल कारण हे प्रकरण विधानसभा होईपर्यंत ऐकलं गेलं नव्हतं. सिब्बल यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचा कायदेशीर आढावा घेतला गेला.विधिमंडळातीळ बहुमत म्हणजे चिन्ह हे सांगितलं गेलं. हे अकॅडमीक नाही.
3) निवडणूक आयोगाने ठरवलं आहे की पक्ष कोण आहे ते. मी तुमच्यासमोर कोणतेही वादग्रस्त सत्य ठेवलं नाही. आमच्या एकूण 3 पीटिशन आहेत.
4) विधानसभा अध्यक्ष नेमणे, विधिमंडळ नेता निवडणे आणि मुख्यमंत्री निवडणे याला आमचा विरोध आहे. गुवहाटी मध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत. विधिमंडळ पक्ष नेता म्हणून शिंदे हे गुवाहाटी मध्ये बसून हे ठरवू शकत नाही.
5) या सगळ्या प्रकरणात आधी वाद तयार करणं, त्यानंतर निवडणूक आयोगात येणं आणि चिन्ह घेणे असा क्रम झाला आहे. या सगळ्या बाबत गुवाहाटी इथं बसून इशारा दिला गेला आणि मग व्हिप नेमला गेला.
6) निवडणूक आयोगाने कोण पक्ष आहे याचा जेव्हा निर्णय दिला ती तारीख महत्वाची आहे. शिंदे हे राजकीय पक्ष हे त्या तारखेपासून आहेत आणि ती तारीख म्हणजे फेब्रुवारी 2023. म्हणजे त्याच्या पूर्वी आम्ही पक्ष होतो ना.
7) विचारधारा वगैरे कारणं त्यांच्याकडून दिली गेली आहेत. मात्र त्याला फार काही आधार नाही. भरत गोगावले यांची व्हिप म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे. कारण ती नियुक्ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती.
8) भारत गोगावले यांना व्हीप नियुक्त करणे आणि सुनील प्रभू यांना काढणे हे कोणत्या कायद्यानुसार आहे ? हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे सगळं (फूट) विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी झाली होती. यासाठीची तयारी पूर्वीच झाली होती आणि त्याला भाजपची मदत होती.
9) शिंदेंचे वकील म्हणतात की हे पक्षांतर्गत विरोध होता. मग मुद्दा राज्यपालांकडे कसा गेला ? या सगळ्यांमध्ये राज्यपाल यांची भूमिका महत्वाची होती. 22 जून रोजी झालेल्या बैठकीचं पत्र हे सुनील प्रभू यांनी काढलं होतं. ते पत्र (बैठकीच पत्र) सगळ्यांना पाठवलं होतं.
10) या प्रकरणात सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. हे बंड ठरवून केलं आहे. निवडणूक आयोगाने कधीही आम्हाला नोटीस दिली नव्हती. संघटनेतील कुठल्याही गोष्टी, स्ट्रक्चर निवडणूक आयोगाने पाहिलं नाही. आयोगाने फक्त विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहून निर्णय घेतला.
11) पक्षप्रमुख हे पद आमच्या घटनेनुसार आहे. शिवसेना पक्षाच्या गटाने ठराव पारित केला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटल होतं की आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडायचं आहे.
12) अजित पवार हे देखील आघाडीचे भाग होते. एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही. 21 जून रोजी एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे म्हणजे फक्त विधिमंडळ पक्ष आहे.
13) एकवेळ आपण मानू की उद्धव ठाकरे म्हणजे पक्ष नाहीत मग उद्धव ठाकरे काय आहेत? आजची सुनावणी संपली. बुधवार होणार पुढील सुनावणी.