जलवा है हमारा! 250 उंटांचा मालक चर्चेत; एका वर्षाच्या कमाईचा आकडा जाणून धक्का बसेल
राजस्थानमधील 250 उंटांचा मालक चर्चेत आला आहे. तुम्हाला या उंट मालकाच्या एका वर्षाच्या कमाईचा आकडा जाणून धक्का बसेल.

देशभरातील लोक पुष्कर जत्रेत अनेक उंट आणि घोडे घेऊन येतात. पुष्कर जत्रेतील उंट आणि घोड्याची जोरदार चर्चा होते. या पुष्कर जत्रेत 250 उंट घेऊन येणाऱ्या मालकाची जोरदार चर्चा होत आहे. 250 उंटाचा मालक हा जत्रेत 18 लाखांची कमाई करतो. सध्या त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहन बा असे उंट मालकाचे नाव आहे.
सोशल मीडियावर मोहन बा यांचा थार गाडीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोहन हे उंटाविषयी सांगत आहेत. काही पोस्टममध्ये मोहन बा यांच्याजवळ 200 उंट असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काही पोस्टमध्ये 250 उंट असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा मोहन बा हे थार गाडी घेऊन जत्रेत आले होते. जत्रेत पोहोचल्यानंतर अनेकांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. मोहन बा फक्त त्यांच्याजवळील उंटाची माहिती सांगत नाही. तर उंटामुळे होणाऱ्या कमाईविषयी देखील दिलखुलासपणे सांगतात.
मोहन बा यांना उंटाकडून हे दररोज 300 लिटर दूध मिळते. उंटाचे दूध हे प्रति लिटर 40 रुपयांना विकण्यात येते. मोहन बा यांची एका दिवसाला जवळपास 12 हजार रुपयांची कमाई होते. याच कमाईतून खर्चाची रक्कम वजा करावी लागते. मोहन बा सांगतात की, उंटासाठी ट्रान्सपोर्ट आणि चाऱ्यासाठी 2 हजार रुपये खर्च होतात. त्यामुळे ते दिवसाला दूध विक्रीतून 10 हजार रुपयांची कमाई करतात. मोहन बा यांची वार्षिक कमाई 35 लाखांपर्यंत पोहोचते. मोहन बा यांची कमाई दूधाच्या आकडेवारीवरून निश्चित होते. मोहन बा सांगतात की, प्रत्येक वर्षाला जवळपास 100 उंट घेऊन पुष्कर जत्रेत पोहोचतात. उंटाच्या दुधाची विक्री त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. त्यामुळे ते उंटाच्या संरक्षणाची मागणी करत आहे. मोहन बा यांचं म्हणणं आहे की, राजस्थान सरकारने त्यांच्या उंटाकडे लक्ष दिलं पाहिजे. भजनलाल सरकारने काही जंगल ह उंटासाठी खुले केले पाहिजे. जेणेकरून त्यांना चरण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध होईल. राजस्थानमधील काही जंगल खुले झाल्यास पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
