AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…म्हणून अजित पवार नॉट रिचेबल”, भास्कर जाधव यांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार हे या अधिवेशनात उपस्थित राहिलेले नाहीत. गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मोठी टीका केली आहे.

...म्हणून अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधव यांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Dec 17, 2024 | 3:21 PM
Share

Bhaskar Jadhav On Ajit Pawar : महाराष्ट्रातील महायुती सरकाराचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. मात्र यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र अजित पवार हे या अधिवेशनात उपस्थित राहिलेले नाहीत. गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मोठी टीका केली आहे.

“विरोधी पक्षनेता शिवसेनेचा व्हावा हीच आमची भूमिका”

भास्कर जाधव यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “उद्धव ठाकरे यांचे नागपूर नगरीमध्ये स्वागत आहे. आज अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांचे ते मार्गदर्शन करतील. अधिवेशन काळामध्ये आमची संख्या आमदारांची जास्त असल्याने विरोधी पक्ष नेते पदाचा जो दावा आहे, तो आम्ही सोडलेला नाही. आजही विरोधी पक्ष नेता विधानसभेत शिवसेनेचा व्हावा ही आमची भूमिका आहे मागणी आहे. माझ्या नावाची चर्चा घरी असली तरी देखील विरोधी पक्षनेता कोण व्हायचं व्हावं, याचा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे घेतील. मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी नेटाने पार पाडेन”, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

“अजित पवार नॉट रिचेबल”

“छगन भुजबळ या वयात काय बंड करणार? जर बंड करायचं असते तर त्यांनी आधीच केलं असतं. पण आता ते काय बंड करणार, त्यांचे वय होऊन गेले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालेला नाही. छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको. समोरासमोर यायला नको म्हणून अजितदादा नॉट रिचेबल झाले असतील”, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला.

“…म्हणून छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे समजते”

“बटेंगे तो कटेंगे याचंचं नाव भाजप आहे. एकनाथ शिंदे देखील बटले नव्हते पण भाजपने त्यांना शिवसेनेपासून कट केलं. त्यामुळे भाजपचं मुख्य सुत्रधार आहे. भाजपचे पाशवी बहुमत असल्याने काही लोकांना घ्या. काहींना घेवू नका, असे भाजपने सांगितल्याने ज्येष्ठ मंत्र्यांना वगळले असेल. त्यामुळेच छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे समजतं आहे. चैन पडेल अशा ठिकाणी ते जातील असं वाटत नाही. काही पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचे नाराजीनाट्य, रुसला, रागावला याचे जास्त महत्व महायुतीत नसेल. कोण नाराज आहे. याचे मला जराही दु:ख नाही”, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.