AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लाडके आमदार, नावडते आमदार यापेक्षा…”, लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. "आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लाडके आमदार, नावडते आमदार यापेक्षा..., लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
| Updated on: Dec 17, 2024 | 3:22 PM
Share

Uddhav Thackeray On Ladki bahin Yojana : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. “सध्या लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाली आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.

आवडती नावडती बहीण न करता पैसे सरसकट जमा व्हायला पाहिजेत

“सध्या लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाली आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे. लाडक्या बहिणीचे पहिल्या पाच महिन्याचे ७५०० जमा झाले. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थिगिती मिळाली. निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. निवडणुकीच्या आधी ज्याप्रकारे तात्काळ पैसे दिले गेले. त्याप्रमाणे आता ही योजना तात्काळ सुरु केली पाहिजे आणि १५०० नव्हे तर महायुतीने २१०० प्रमाणे पैसे द्यायला हवेत. त्यात परत आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आवडती नावडती बहीण करु शकत नाही

एका घरात एकाच महिलेला मिळणार आहे. अमूक बघणार, तमूक बघणार असे सुरु आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही डाव होते. ते आता उघडे झालेत. त्यामुळे आता तुम्ही बहि‍णींमध्ये आवडती नावडती बहीण करु शकत नाही. करता कामा नये. जसं गेल्यावेळी तुम्ही निकष न लावता लाडक्या बहिणीच्या योजनेतंर्गत पैसे दिले, ते पैसे आता हे निकष बाजूला ठेवून २१०० रुपये तात्काळ माझ्या बहि‍णींच्या खात्यात जमा व्हायला पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला