Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळांना दूर करू शकता, पण खुनाचा संशय असलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान कसं ? संजय राऊतांचा सवाल

बीड आणि परभणीसंदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे असे लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत. छगन भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं ? असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला.

छगन भुजबळांना दूर करू शकता, पण खुनाचा संशय असलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान कसं ? संजय राऊतांचा सवाल
शिवसेना खासदार संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 10:26 AM

विरोधी पक्षानं, जनतेनं, नागरिकांनी काय करावं, कुठे जावं, काय खावं, कोणत्या भूमिका मांडाव्यात हे नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस ठरवणार ? या देशात लोकशाही आहे का ? महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत, त्या राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. मिस्टर फडणवीस, बीड आणि परभणीसंदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे असे लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत. छगन भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं ? असा थेट सवाल विचारत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधाताना, राऊत यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं.

तुम्ही बीडला गेलात का ?

न्यायाच्या, द्वेषाच्या गोष्टी करणारे फडवणीस गृहमंत्री म्हणून बीडला गेले का ? राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले, यामुळे तुमचं पित्त का खवळलं ? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना केला. राहुल गांधी हे लकोसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांन जो संसदेत जो दर्जा दिला आहे, तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी, अमित शाह किंव फडणवीसांनी दिलेला नाही. जेव्हा तुमच्या हातात होतो, तेव्हा तुम्ही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू दिलं नाहीत, आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार त्यांना हे पद मिळालंय. मोदींना तिथे बहुमत नाहीये हे मान्य करा, ते कुबड्यांवर आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली.

राहुल गांधी परभणीत गेले म्हणून टीका करायच्या आधी, तुम्ही तेथे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून जायला हवं होतं, तुम्ही गेलात का ? तुम्हाला तिथे जाण्याची भीती वाटली, तिथे गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल तिथे, असा टोला राऊतांनी हाणला.

संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. राहुल गांधी त्यांना भेटायला गेले यावर बोलण्यापेक्षा, ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांच्यावर बोला. हा महाराष्ट्र मानवतेसाठी, माणूसकीसाठी ओळखला जात होता. गेल्या पाच वर्षांमध्ये या राज्यामध्ये माणूसकीचा खून झालाय, असे राऊत म्हणाले.

जातीचं राजकारण

ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, अशा व्यक्ती फडणवीसांच्या मंत्रीमंडळात आहेत. तुम्ही छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळातून दूर करू शकता, पण एका खुनाचा , कटकारस्थानाच संशय ज्याच्यावर आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रीमंडळापासून दूर ठेवत नाही ? कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेताय, अशी टीका राऊतांनी फडणवीसांवर केली. काही आमदारांचा विरोध आहे म्हणून भुजबळांना दूर ठेवता, पण जिथे बीडसह महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचा विरोध आहे. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे, अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रीमंडळात नको, अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आल्या. खऱ्या आरोपींना पकडण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का ? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.