AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, लोक चहापाण्याला येतात”; संजय राऊत यांचा खोचक टोला

राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात मात्र निवडणुका जवळ आल्या की ते प्रो भाजप होतात, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, लोक चहापाण्याला येतात; संजय राऊत यांचा खोचक टोला
devendra fadnavis raj thackeray sanjay raut
| Updated on: Feb 10, 2025 | 11:29 AM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वच पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्था’वर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या तासाभरापासून चर्चा सुरु आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुका आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. आता या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली.

संजय राऊतांचा टोला

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथे लोक चहापाणी करायला येतात, असे संजय राऊत म्हणाले. चांगला चहा असेल तर लोक येत असतात, असेही संजय राऊतांनी म्हटले.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या जनतेलाच काय पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पण ही गोष्ट यूज टू झालेली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात मात्र निवडणुका जवळ आल्या की ते प्रो भाजप होतात, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

नियोजित भेट नाही

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट नियोजित नसल्याचे बोललं जात आहे.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास