AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती पुढे, भाजपाला फिरवली मतं, अगोदरच सर्वकाही..

Vidhan Parishad Election Result 2026 Omraje Nimbalkar : विधान परिषद निवडणुकीचे निकाल पुढे आले आहेत. यादरम्यानच आता धक्कादायक आकडेवारी पुढे आली. ओमराजे निंबाळकर यांनी काल शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे जाहीर केले असले तरीही आकडेवारी काही वेगळेच सांगत आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती पुढे, भाजपाला फिरवली मतं, अगोदरच सर्वकाही..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 22, 2026 | 1:16 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केली. लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन केला. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. खासदारांच्या फुटीची कुणकुण लागताच ठाकरे गटाने एक बैठक मातोश्रीवर घेतली. या खासदारांनी या बैठकीला दांडी मारत ऑनलाईन हजर राहिले. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले की, आमचे खासदार कोणीही कुठेच जात नाही. ऑपरेशन टायगर शिंदेचे अयशस्वी झाले. मात्र, त्यानंतर 6 खासदार थेट शिंदेंच्या गळ्याला लागले. दिल्लीत पक्षाकडून व्हिप जारी करत खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. या खासदारांना पक्षाकडून थेट कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. ओमराजे निंबाळकरही शिवसेना शिंदे गटाची साथ दिली. ठाकरे गट सोडण्याची काही कारणेही त्यांनी सांगितली. ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून करण्यात आला.

धाराशिवमध्ये तालुक्यानिहाय ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या आणि जाहीर केले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी हे काल जाहीर केले असले तरीही त्यांनी अगोदरच या निर्णय घेतल्याचे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर स्पष्ट होत आहे.

विधान परिषद निवडणुकीत धाराशिव-लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीसोबत मोठा दगा फटका झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील विजयी झाले. काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव झाला. मात्र, जर आकडेवारी बघितली तर स्पष्ट होते की, महाविकास आघाडीची मते फुटली आहेत.

ओमराजे निंबाळकर यांनी काल जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला असेल मात्र, विधान परिषदेचे मतदान 18 जून रोजी झाले. धाराशिवमधील महेश देशमुख यांची मते थेट महायुतीच्या उमेदवाराकडे वळवण्यात आल्याचे स्पष्ट आहे. ज्यामुळे थेट फायदा झाला. ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गट सोडल्याने मोठा फटका ठाकरेंना बसला.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप