AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, थेट आज सायंकाळी किंवा उद्याच..

खासदार ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका आज किंवा उद्या जाहीर करतील. ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले. ओमराजे निंबाळकर नक्की काय भूमिका घेणार, याकडे राज्याच्या नजरा आहेत. यादरम्यानच त्यांनी मोठे विधान केले.

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, थेट आज सायंकाळी किंवा उद्याच..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 21, 2026 | 10:18 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील सहभागी आहेत. त्यांनी नुकताच आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मोठे विधान केले. ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले. यादरम्यान बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, मी कार्यकर्त्यांसोबत मिळून मी निर्णय घेईल. माझा भाऊ भाड्याने राहतो. सोसायटीतील लोकांना त्रास होतोय. माझ्या मालकीचा फ्लॅट नाही. संयमाने घ्या. धाराशिवला जातो. गोवर्धनवाडीत. 4 वाजता मी त्यांना भेटणार आहे. चर्चा करून कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. मी ज्या पद्धतीने सांगितलं कलियुग आहे. काल 2006 ला आमच्या परिवाराने दुख भोगले. 20 वर्षानंतर तेच दुख आणि त्याच दिवशी आम्ही दुख भोगलो. वडिलांची हत्या झाली तो दिवस शनिवार होता. काल दुर्देवाने शनिवार होता. हत्येचा उद्घेश होता. राजकीय वैमनस्य होतं असं कोर्ट म्हणतंय. पण निकाल आमच्या बाजूने आला नाही. कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान आहे. आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.

ज्या दिवशी वडील गेले. तेव्हापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवात करण्याचं कारण वडील होते. प्रत्येक लोकांच्या कामाला पडण्याचं काम केलं. या चांगल्या कामाचा न्याय, मुलगा म्हणून परिवार मागत होता. पण तो काही मिळाला नाही. हाय कोर्टात सीबीआय जाणार आहे. सीबीआय हायकोर्टात गेल्यावर खालच्या कोर्टात ज्या गोष्टी आल्या त्याची दाद मागणार. सीबीआयने जो तपास केला, त्या नुसार न्याय द्यावा ही मागणी करणार

पुढे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, माझ्या आयुष्यात राजकीय जीवनाची सुरुवात करण्याचं कारण वडिलांची हत्या होती. या जन्मात तरी या माणसाचं राजकारण साध्य होऊ द्यायचं नाही. एका माणसाला मारल्याने राजकारण थांबत नाही. तितक्याच ताकदीने राजकारण वाढतं हे दाखवून द्यायचं आहे. म्हणून राजकारणात आलो. निर्णय जाहीर केला नाही. पण माझ्या कुटुंबाचा उद्धार केला आहे. त्यांचा काही संबंध नव्हता. मी त्यांच्या कामाला पडलो. पण त्यांनी उद्धार केला.

मी तेही सहन केलं. या राजकीय प्रक्रियेत माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलं? माझ्या कुटुंबाने काय त्रास दिला. तीन दिवसात मी एवढा मोठा वाईट झालो का. मी रिल्स स्टार आहे. तर रिल्सस्टारला लोकं एवढी मतं टाकतात का. 16 तारखेला निकाल होता. तो लांबला. मी राजकीय निर्णय धाराशिवला जाऊन जाहीर करेन. आज चर्चा करून झालं तर आज नाही तर उद्या निर्णय जाहीर करणार. दोन्ही पक्षाची भावना आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कोण माझ्यासोबत यावं कोण नाही यावं हे मी ठरवू शकत नाही.

तुम्ही आले तर तुम्हाला मी नाही म्हणू शकतो का. माझी राजकीय भूमिका आज नाही तर उद्या जाहीर करेल. उद्धव ठाकरे आणि आदित्यबद्दल माझा अवाकक्षर जाणार नाही. माझी इंटरव्यूव छापली. न बोलता माझी मुलाखत छापत असेल तर चुकीचं आहे. लोकसभा, विधानसभेत लोक उभे राहिले. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात नगरपालिका, पंचायत समितीत माझी एकही निवडून आली नाही. एकही नगरपालिका निवडून आली नाही. एवढे आम्ही वाईट आहोत का.

24 तास आम्ही लोकांना देतो. आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहे. मशाल चिन्हावर उभ्या असलेल्या आमच्या कार्यकर्त्याला पराभूत का व्हावं लागलं. माझा एक कार्यकर्ता तिसऱ्या क्रमांकावर गेला. मेहनती कार्यकर्ता होता. आमच्या कार्यकर्त्यांची हेटाळणी का झाली. आम्ही निष्ठावंत होतो, तुमच्यासाठी उभे होतो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा कार्यकर्ता उभा केला नाही. लोकांसाठी झटणारा होता. आमच्या लोकांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. ही वस्तुस्थिती होईल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल