धक्कादायक, महाराष्ट्रात एकूण ५०३७ पाकिस्तानी नागरिक राहतात…१०७ पाकिस्तानी नागरिक तर
जळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे जिथे ३९३ पाकिस्तानी नागरिक राहतात. पिंपरी- चिंचवड चौथ्या क्रमांकावर असून येथे २९० पाकिस्तानी नागरिक राहतात अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

एकीकडे पहलगाम हल्ल्यावरुन संतापाचा कडेलोट झाला असताना दोन्ही देशातील तणाव वाढत आहे. मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशातील संतापाचा लाट निर्माण झाली असता केंद्र सरकारने सिंधु नदी पाणी वाटप करार रद्द करणे, एकमेकांच्या दुतावासातील अधिकाऱ्या देश सोडून जाण्यास सांगणे, अटारी बॉर्डर बंद करणे, व्हिसा रद्द करणे, पाकिस्तनी नागरिकांना ४८ तासात देश सोडून जाण्यास सांगितले असताना आता महाराष्ट्रातच अनधिकृत आणि अधिकृत अशा एकूण पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी बाहेर पडली आहे.
महाराष्ट्रात एकूण ५०३७ पाकिस्तानी नागरिक राहतात. या एकूण ५०३७ पाकिस्तानी नागरिकांपैकी १०७ पाकिस्तानी नागरिकांना शोधणे एकतर पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे (अदृश्य) किंवा भारतात आल्यानंतर हे पाकिस्तानी नागरिक येथील कागदपत्रे मिळवून येथील नागरिक झालेले आहेत किंवा भूमिगत झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण ३४ पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
मुंबईतील राहणाऱ्या १४ पाकिस्तानींना शोधून काढले
पोलिसांनी मुंबईतील राहणाऱ्या १४ पाकिस्तानींना शोधून काढले आहे. त्यातील तीन नागरिकांची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक असून नागपूर शहरात एकूण २४५८ पाकिस्तानी नागरिक आहेत ज्यापैकी २५ पाकिस्तानी लोकांचा शोध लागलेला नाही. ठाणे शहर दुसऱ्या क्रमांकावर असून येथ ११०६ पाकिस्तानी नागरिक राहातात, तर ३३ जणांचा शोध लागलेला नाही आणि ८ पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे उघडकीस आले आहे.
जळगाव तिसऱ्या क्रमांकावर
जळगाव तिसऱ्या क्रमांकावर असून येथे ३९३ पाकिस्तानी नागरिक राहतात. पिंपरी- चिंचवड चौथ्या क्रमांकावर असून येथे २९० पाकिस्तानी नागरिक राहतात. नवी मुंबई पाचव्या स्थानावर आहे. येथे २३९ पाकिस्तानी नागरिक राहतात, त्यापैकी २ पाकिस्तानी लोकांचा शोध लागलेला नाही. सहाव्या क्रमांकावर अमरावती शहरात ११७ पाकिस्तानी नागरिक आहेत.
कोल्हापूरात ५८ पाकिस्तानी नागरिक
सातव्या क्रमांकावर पुणे शहर आहे जिथे ११४ पाकिस्तानी नागरिक राहतात, त्यापैकी ९ पाकिस्तानी बेपत्ता आहेत आणि २४ पाकिस्तानी बेकायदेशीरपणे राहत आहेत.आठव्या क्रमांकावर वासीम शहर आहे जिथे १०६ पाकिस्तानी नागरिक राहतात. नवव्या क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर शहर आणि कोल्हापूर आहेत जिथे ५८ पाकिस्तानी नागरिक राहतात. दहाव्या क्रमांकावर मीरा भाईंदर आहे जिथे २६ पाकिस्तानी नागरिक राहतात.
रायगडमधील १७ पाकिस्तानी नागरिकांपैकी ११ बेपत्ता
अकोल्यात २२ पाकिस्तानी नागरिक राहतात, त्यापैकी २ पाकिस्तानी नागरिकांचा शोध लागलेला नाही. अहिल्यानगर नगर आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी १४ पाकिस्तानी नागरिक राहतात. रायगड जिल्ह्यात १७ पाकिस्तानी नागरिक राहतात, त्यापैकी ११ पाकिस्तानी बेपत्ता आहेत आणि २ लोक बेकायदेशीरपणे राहत आहेत. सोलापूर शहरात १७ पाकिस्तानी नागरिक राहतात.
लातूर शहरात ८ पाकिस्तानी
अमरावती ग्रामीण आणि छत्रपती संभाजी नगर ग्रामीणमध्ये प्रत्येकी 1 -1 पाकिस्तानी आहे. बुलढाण्यात ७ पाकिस्तानी नागरिक राहतात त्यापैकी ६ जणांचा शोध लागत नाही. धुळे शहरात ६ पाकिस्तानी नागरिक राहतात, ५ पाकिस्तानी नागरिक गोंदियामध्ये राहतात आणि सर्व ५ जण बेपत्ता आहेत. लातूर शहरात ८ पाकिस्तानी नागरिक आहेत ज्यापैकी ६ जणांचा शोध लागत नाही.
नाशिक शहरात ८ पाकिस्तानी नागरिक
जालन्यात ५ पाकिस्तानी नागरिक आहेत, नाशिक शहरात ८ पाकिस्तानी नागरिक राहतात त्यापैकी २ पाकिस्तानी बेपत्ता आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये २ पाकिस्तानी आहेत, त्यापैकी १ पाकिस्तानी बेपत्ता आहे. नांदेडमध्ये ४ पाकिस्तानी नागरिक आहेत ज्यापैकी चारही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. नंदुरबारमध्ये 10, परभणीत 3 आणि पालघरमध्ये 1 पाकिस्तानी राहतात. तर, रत्नागिरीमध्ये ४ पाकिस्तानी राहतात ज्यापैकी १ सापडलेला नाही, ४ पाकिस्तानी सातारा येथे राहतात आणि ६ पाकिस्तानी नागरिक सांगली येथे राहतात.
