AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मिरात पुन्हा अतिरेकी हल्ल्याचा अलर्ट, लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर पुन्हा पर्यटन स्थळं

जम्मू- काश्मिरातील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी मोठा हल्ला झाल्यानंतर त्यात २६ पर्यटकांचा हकनाक मृत्यू झाल्यानंतर एकीकडे सीमेवर चककमी झडत असताना पुन्हा नवा अलर्ट जारी झाला आहे.

काश्मिरात पुन्हा अतिरेकी हल्ल्याचा अलर्ट, लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर पुन्हा पर्यटन स्थळं
| Updated on: Apr 26, 2025 | 5:04 PM
Share

पहलगामवरील अतिरेकी हल्ल्यानंतर दोन अण्वस्रधारी देश युद्धाच्या उबंरठ्यावर आहेत, अशात आता गुप्तचर संस्थांनी काश्मीरात पुन्हा हल्ले होऊ शकतात असा इशारा दिल्याने सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर मोडवर गेली आहे. लष्कर- ए- तैयबा या खतरनाक अतिरेकी संघटनेच्या मॉड्यूलपासून सावधान राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. या गुप्त माहितीनुसार हे खतरनाक मॉड्युल पुन्हा हल्ले करण्याच्या तयारीत आहे. अतिरेकी येथे टार्गेट किलींग सह मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे कश्मिरातील पर्यटकांनी हे राज्य सोडण्यास सुरुवात केली आहे.

जम्मू- काश्मिरातील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी मोठा हल्ला झाल्यानंतर त्यात २६ पर्यटकांचा हकनाक मृत्यू झाल्यानंतर एकीकडे सीमेवर चककमी झडत असताना पुन्हा नवा अलर्ट जारी झाला आहे. हा हल्ला  The Resistance Front (TRF) ने केल्याचे आधी सांगितले जात होते. मात्र या संघटनेने दावा मागे घेतला आहे. पाकिस्तानने आम्ही देखील दहशतवादाने पीडीत आहोत असा कांगावा सुरु केला आहे.

सुरक्षा एजन्सी हायअलर्ट मोडवर

दक्षिणी काश्मिर मॉड्यूलच्या निशारण्यावर असल्याचे उघडकीस आले आहे. अतिरेक्यांच्या निशाण्यावर अनेक टुरिस्ट प्लेस आहेत. त्यामुळे अशा टुरिस्ट स्पॉटचे संरक्षण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा एजन्सींना हायअलर्ट मोडवर ठेवले आहे.काश्मिरात पुन्हा हल्ले होण्याचा इशारा देण्यात आल्याने हा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सेना आणि निमसुरक्षा दले जागोजागी तैनात झाले आहे.

गुप्तचर खात्याच्या इनपुट्स नुसार आतंकवादी गट येत्या काही दिवसात पर्यटकांना पुन्हा लक्ष्य करूशकतात. अल्पसंख्यांक काश्मिरी पंडीताचे गट आणि सुरक्षा कर्मचारी या पायाभूत संरक्षण यंत्रणेवर आघात करण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा उघडकीस आला आहे.

हॉस्पिटलना केले सज्ज

पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या काही दिवसांनंतर जम्मू-कश्मीराच्या दोन मोठ्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सावध राहाण्याचा इशारा दिला आहे.कोणत्याही आपात्कालिन स्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहा. एका हॉस्पिटलने हा आदेश काही तासांनंतर मागे घेतला. शुक्रवारी सायंकाळी मेडिकल कॉलेज जम्मूने काश्मिरातील एक एडव्हायजरी जारी करीत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.