AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

नीट 2024 परीक्षेत महाराष्ट्राच्या श्रावणी कुदळे हिने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने 720 पैकी 710 गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. पेपरफुटीच्या नकारात्मक वातावरणात हे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. बारामतीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या या कन्येच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, तिने महाराष्ट्राचे नाव उज्वल केले.

अभिमान वाटावा असंच... नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?
श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली
| Updated on: Jul 18, 2026 | 1:07 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणाने महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थी खचले. पण राज्यावरील बदनामीचा हा डाग महाराष्ट्रातील लेकींनीच धुवून काढला आहे. परवा नीट परीक्षेचा निकाल लागला. नीट परीक्षेत महाराष्ट्राची लेक श्रावणी कृष्णा कुदळे ही मुलींमध्ये देशात आणि महाराष्ट्रात पहिली आली आहे. श्रावणीच्या या घसघशीत यशावर तिचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी श्रावणीचं अभिनंदन करून तिचा सत्कार केला आहे.

श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. तसेच महाराष्ट्रात नीट परीक्षेत पहिली येण्याचा मानही तिने पटकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे आई-वडील देखील आनंदी आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे हे शिक्षक आहेत. मुलगी इतकं मोठं यश संपादन करेल, असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया श्रावणीची आई जयश्री आणि वडील कृष्णा कुदळे यांनी दिली आहे. तिने यश संपादन केलं त्याचं कौतुक तिच्या आई-वडिलांना आहे.

बायोलॉजीत पैकीच्या पैकी

श्रावणीने नीट परीक्षेत 720 पैकी तिने 710 मार्क मिळवले आहेत. बायोलॉजीमध्ये तिने पैकीच्या पैकी म्हणजे 360 पैकी 360 मार्क मिळवले आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 तर फिजिक्स 180 पैकी 175 मार्क मिळवले आहेत.

कोण आहे श्रावणी?

श्रावणी कुदळे ही बारामतीची आहे. श्रावणी ही पुण्यातील दौंड तालुक्यातील खडकी गावची आहे. श्रावणीचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. श्रावणीचे प्राथमिक शिक्षण दौंडच्या गोपाळवाडी चोरमले वस्तीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर माध्यमिक शिक्षण माळेगावच्या शारदाबाई पवार प्राथमिक शाळेत झालं. नंतर तिने माळेगावच्याच शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये हायस्कूलच तर लडकत स्कूलमध्ये अकरावी तसेच बारावीचं शिक्षण घेतलं.

सुनेत्रा पवारांचा व्हिडीओ कॉल

दरम्यान, श्रावणी कृष्णा कुदळे हिने 720 पैकी 710 गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम येत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रावणी कुदळे हिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी श्रावणीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी श्रावणीच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तिच्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. तसेच, “दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत,” अशी भावनाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

गुणवत्तेवर विश्वास ठेवून

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही श्रावणीचं अभिनंदन केलं आहे. पेपरफुटीसारख्या अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर नीट परीक्षेत बारामतीची श्रावणी कुदळे हिने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तिचं हे यश प्रेरणादायी असून या दैदिप्यमान यशाबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! तसंच, मुलगी आणि मुलगा असा कोणताही भेदभाव न करता श्रावणीच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून तिच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन, पाठबळ आणि मोलाची साथ दिल्याबद्दल तिचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे यांचेही मनःपूर्वक अभिनंदन, असं रोहित पवार यांनी मह्टलंय.

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत