AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकरमान्यानू, भराडी देवीचा कौल मिळाला, आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली

कोकणातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही यात्रा दरवर्षी देवीला कौल मागून निश्चित केली जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातून लाखो भाविक येतात.

चाकरमान्यानू, भराडी देवीचा कौल मिळाला, आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली
Anganewadi Jatra
| Updated on: Dec 03, 2025 | 8:51 AM
Share

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे येथील श्री देवी भराडी यात्रेची तारीख अखेर ठरली आहे. श्री देवी भराडी देवीचे मानकरी असलेल्या आंगणे कुटुंबियांनी जाहीर केली आहे. येत्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी भराडी देवीचा हा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या यात्रेची तारीख जाहीर होताच, केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रेची तारीख कशी ठरते?

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा दरवर्षी एखाद्या ठराविक तिथी किंवा निश्चित तारखेला होत नाही. या यात्रोत्सवाची तारीख ठरवण्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे. यावेळी गावातील मानकरी एकत्र येऊन विशिष्ट धार्मिक विधी पार पाडतात. त्यानंतर, देवीच्या मंदिरात पंचांग ठेवले जाते आणि देवीला कौल मागितला जातो. देवीच्या कौल मिळाल्यानंतर मानकरी असलेले आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळाकडून एकमताने यात्रेची अधिकृत तारीख जाहीर केली जाते. याच प्रथेनुसार यंदा 9 फेब्रुवारी 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेमुळेच दरवर्षी यात्रेची तारीख कधी जाहीर होणार याकडे संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले असते.

श्री देवी भराडी आई हे कोकणातील लाखो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या देवीला नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे गावातील आंगणेवाडी येथे आहे. भराडी देवीचे मंदिर हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी मंदिर असले तरी ते सर्व भाविकांसाठी खुले असते. दरवर्षी या यात्रेला विविध राजकीय नेते, अधिकारी, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि लाखो सामान्य भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. एका दिवसाच्या या यात्रोत्सवात प्रचंड मोठी गर्दी असते.

भाविकांमध्ये लगबग सुरू

आंगणेवाडी यात्रेसाठी लाखो भाविक देशभरातून येत असल्याने प्रशासकीय पातळीवर मोठे नियोजन केले जाते. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्यांतर्गत तसेच मुंबई आणि पुणे येथून जास्त एसटी गाड्या आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो. आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळ भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी महिनाभर तयारी केली जाते. येत्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या यात्रोत्सवासाठी आतापासूनच भाविकांमध्ये लगबग सुरू झाली आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.