Agneepath Scheme: सोलापूरात पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांच्या प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न; अग्निपथ विरोधात युवा महासंघाचे जोरदार आंदोलन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळून अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Agneepath Scheme: सोलापूरात पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांच्या प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न; अग्निपथ विरोधात युवा महासंघाचे जोरदार आंदोलन
अग्निपथ योजनेविरोधात सोलापूरात जोरदार निदर्शनं
सागर सुरवसे

| Edited By: महादेव कांबळे

Jun 20, 2022 | 3:30 PM

सोलापूर: अग्निपथ ही योजना (Agneepath Scheme) देशाची संरक्षण व्यवस्था व गोपनीयतेला तिलांजली देऊन प्रचंड बेकारीची फौज निर्माण करणारी आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तरुणांना दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात देशात सर्वत्र हाहाकार माजत आहे,याची दखल सरकार घ्यायला तयार नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने कोणत्याही परिस्थितीत ही योजना माघार घेतलीच पाहिजे अन्यथा हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होणार असा इशारा युवा महासंघाचे (Yuva Mahasangh) जिल्हा सचिव अनिल वासम यांनी दिला आहे.

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीच्यावतीने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी सकाळी 11 वाजता युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

पंतप्रधानांची प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळून अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

आंदोलकांवर पोलिसांची दडपशाही

यावेळी पूनम गेट येथे सकाळी 11 वाजता पोलिसांचा प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी युवा महासंघाचे कार्यकर्त्यांनी एकत्र जमून अग्निपथ योजनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्ते नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दडपशाही करून प्रतिमा जाळण्यास अटकाव केला.

प्रतिमा फाडून घोषणाबाजी

तरीही सर्व कार्यकर्त्यांनी प्रतिमा फाडून घोषणाबाजी केली. या मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. यावेळी धक्काबुक्कीचेही प्रकार घडेल. त्यानंतर सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी युवा महासंघाच्या 16 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हा

यामध्ये विक्रम कलबुर्गी, अनिल वासम,बाळकृष्ण मल्याळ, दत्ता चव्हाण, अकील शेख, सनी कोंडा, नरेश गुलापल्ली,मधुकर चिल्लाळ, आसिफ पठाण, राहुल बुगले, मोहसीन शेख, सद्दाम बागवान, कुमार येलगेटी, नितीन माकम, योगेश आकिम, बालाजी गुंडे, सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें