AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महिलांनी काय करावं हे कोणी सांगू नये’, अमृता फडणवीस यांचा संभाजी भिडे यांना टोला

अमृता फडणवीस या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर अमृता यांनी या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

'महिलांनी काय करावं हे कोणी सांगू नये', अमृता फडणवीस यांचा संभाजी भिडे यांना टोला
| Edited By: Chetan Patil | Updated on: Nov 03, 2022 | 10:20 PM
Share

सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. संभाजी भिडे यांनी बुधवारी (2 नोव्हेंबर) एका महिला पत्रकाराला उद्देशून एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विधानाचा अनेकांकडून निषेध व्यक्त केला जातोय. फक्त सोशल मीडिया नाही तर विविध माध्यमातून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर विविध स्तरावरुन टीका केली जातेय. या दरम्यान अमृता फडणवीस या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर अमृता यांनी या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

“संभाजी भिडे गुरुजींचा आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहेत. पण महिलांनी काय करावं, कसं जगावं, हे कोणी सांगू नये”, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंढरपुरात विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अमृता यांनी संभाजी भिडे यांच्या विधानावर भूमिका मांडली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्तेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी बुधवारी (2 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एका महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाहीये…’, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं.

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्य महिला आयोग देखील आक्रमक झाले आहे. राज्य महिला आयोगाकडून भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा करावा, अशी नोटीस भिडे यांना पाठवण्यात आली आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?