AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामाख्या देवीच्या दर्शनावेळी पुजाऱ्यानं केलं होतं मोठं भाकित, शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं

नवस फेडण्यासाठी त्याठिकाणी चाललोय. दर्शन घेऊन आपआपल्या मतदारसंघात जाणार आहोत, असंही पाटील यांनी सांगितलं.

कामाख्या देवीच्या दर्शनावेळी पुजाऱ्यानं केलं होतं मोठं भाकित, शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं
शहाजीबापू पाटील
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 25, 2022 | 8:22 PM
Share

सोलापूर – शहाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. मागच्या वेळी गुवाहाटीला गेल्यानंतर काय डोंगर, काय झाडी, ही डायलॉग प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले,  आम्ही शिवसेना बचावचा उठाव केला होता. त्यावेळी आम्हाला गुवाहाटीला जावं लागलं होतं. ती वैचारिक आणि महत्त्वाची अशी लढाई होती. ती जिंकावी, अशी मनोधारणा कामाख्या मातेकडं विनंती केली होती. पूजारी यांनी एकनाथ शिंदे यांनी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहात, असं भाकित केलं होतं. त्यानंतर पुन्हा कामाख्यादेवीच्या दर्शनाला येणार असंही म्हटलं होतं. नवस फेडण्यासाठी त्याठिकाणी चाललोय. दर्शन घेऊन आपआपल्या मतदारसंघात जाणार आहोत, असंही पाटील यांनी सांगितलं.

तिथंल्या भावभावनांचं विश्व ताज्या होणार आहेत. माझ्या त्या संवादानं मिळालेली प्रसिद्धी आणि जनतेनं केलेलं मायदेशी भाषेचं कौतुक यामुळं निश्चितपणानं कामाख्यादेवीच्या दर्शनानं माझ्या डोळ्यात अश्रू येणार आहेत.

गुवाहाटी येथे वर्षातून एक वेळा आम्ही पती-पत्नी दरवेळी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊ, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

गेल्यावेळी परिवर्तन करण्यासाठी गेलो. यावेळी एकजुटीनं विकास करण्याचा संकल्प करणार आहोत. कर्नाटकच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी असं वादग्रस्त विधान केलं होतं. पण, एक एकर जमीनसुद्धा आम्ही सोडणार नाही. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देणार आहे.

बेळगाव, खानापूरसह अखंड महाराष्ट्र पुन्हा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्मित केलेल्या महाराष्ट्रातील मावळे अद्याप जिवंत आहेत, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.

Follow Us
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान