Solapur Crime : शस्त्राचा धाक दाखवून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील प्रवाशाला लुटले, अडीच लाखाचा ऐवज लुटला

| Updated on: Feb 27, 2022 | 9:30 PM

रचप्पा सुतार हे बदलापूर येथील रहिवासी असून ते 4 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने कल्याण ते सोलापूर असा प्रवास करीत होते. गाडी पहाटे 5.30 च्या सुमारास कुर्डूवाडी स्थानका दरम्यान आली असता अज्ञात चोरट्याने सुतार यांच्या हँडबॅगेतून सोन्याच्या दागिने, मोबाईल आणि अन्य वस्तू चोरुन नेल्या.

Solapur Crime : शस्त्राचा धाक दाखवून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील प्रवाशाला लुटले, अडीच लाखाचा ऐवज लुटला
लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी
Follow us on

सोलापूर : सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून कल्याण ते सोलापूर दरम्यान 3 टायर एसीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशा (Passenger)ला धारदार शस्त्राचा धाक दाखवून कुर्डुवाडी स्थानका दरम्यान लुटल्या (Loot)ची घटना घडली आहे. सोन्यासह रोख मोबाईल व अन्य असा एकूण 2 लाख 48 हजार 224 रुपयांचा ऐवज असणारी हँडबॅग लुटून नेली आहे. रचप्पा वीरभद्रप्पा सुतार असे लुटण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत या प्रवाशाने दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत अज्ञात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीसह गाडी क्रॉसिंगला थांबल्यावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Passengers of Siddheshwar Express were robbed at kurduwadi)

एकूण 2 लाख 48 हजार 224 रुपयांचा ऐवज लंपास

रचप्पा सुतार हे बदलापूर येथील रहिवासी असून ते 4 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने कल्याण ते सोलापूर असा प्रवास करीत होते. गाडी पहाटे 5.30 च्या सुमारास कुर्डूवाडी स्थानका दरम्यान आली असता अज्ञात चोरट्याने सुतार यांच्या हँडबॅगेतून सोन्याच्या दागिने, मोबाईल आणि अन्य वस्तू चोरुन नेल्या. सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल, स्टीलचा डबा, पर्स असा एकूण किंमत 2 लाख 48 हजार 224 रुपये आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात उशिरा 23 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरु

सुतार यांनी ऑनलाईन पध्दतीने मेलद्वारे तक्रार दिली होती. त्याची नोंद 23 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोलिसांत झाली आहे. अज्ञात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिस कसून तपास करीत आहेत. कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीसह गाडी क्रासिंगला थांबल्यावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये देखील आता भितीचे वातावरण आहे. (Passengers of Siddheshwar Express were robbed at kurduwadi)

इतर बातम्या

Wardha Crime : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात झिंगाट पार्टी, आयोजकासह फार्म मालकाला अटक

Nanded Crime : नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, तोडफोड आणि जाळपोळीत पाच मोटारसायकलचे नुकसान