AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: हायवेवरच बस पेटली, चांदणी चौकातील हायवेवरच बर्निंग बसचा थरार!

आग विझवताना कोथरुड अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर  (वय 54) जखमी झाले आहेत. आग विझवत असताना गजानन पाथ्रुडकर यांच्या चेहरा व हाताला अंदाजे 20ते 25 टक्के भाजले आहे. त्यांना उपचाराकरिता तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Video: हायवेवरच बस पेटली, चांदणी चौकातील हायवेवरच बर्निंग बसचा थरार!
Pune bus fire
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 27, 2022 | 6:36 PM
Share

पुणे – शहरात आज दिवसभरात वेगवेगळ्या परिसरात तीन घटना घडल्या आहेत. कोथरुडमधील( kothrud)  चांदनी चौक परिसरातील हायवेवर  बसला (BUS) आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने(Firefighters) तातडीनं घटनास्थळावर धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. बसला लागलेली आग विझवताना कोथरुड अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर  (वय 54) जखमी झाले आहेत. आग विझवत असताना गजानन पाथ्रुडकर यांच्या चेहरा व हाताला अंदाजे 20ते 25 टक्के भाजले आहे. त्यांना उपचाराकरिता तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले. सद्यस्थितीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने द दिली आहे. बसला लागलेल्या आगीचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही.

 गाद्याचे गोडाऊन जाळून खाक

शहराच्या उंड्री-पिसोळी, आंबेकर हॉटेलजवळ एका गोडाउनला आग लागल्याची घटना सकाळी घडली होती . या घटनेची माहिते मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटना स्थळावर रवाना झाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले गोडाऊन हे गाद्याचे असल्याची माहिती समोर आली आहे. हे गोडाऊन बंद असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जाळून खाक झाले.

टेम्पो पेटवून दिला

त्यानंतर दुसरीकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरलोणावळा हद्दीत कार व टेम्पोचा अपघात झाला . यामध्ये चिडलेल्या कार   चालकाने टेम्पो पेटवून दिल्याची घटना घडली आहे. भेंडे आडनावाचा कार चालक पुण्याला येत होता. लोणावळ्याजवळ आला तेंव्हा त्याची धडक माश्यांची वाहतूक पुढच्या छोटा हत्तीला लागली. यात कारचे नुकसान झाले. याच रागातून भेंडे ने छोटा हत्ती पेटवून दिला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण छोटा हत्ती जळून खाक झाला. काहीकाळ पुण्याकडे येणारी वाहतूक विस्कळीत होती. ती आता पूर्ववत झालेली आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘झुंड मराठीत का केला नाही’ विचारणाऱ्यांना नागराज मंजुळेंचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “मग पुष्पा..”

रशियन फौजा Ukraine मध्ये कुठे-कुठे घुसल्या? | Russia Ukraine Conflict

राऊतांच्या दारात बसणाऱ्यानं मॅनेज करुन कंत्राट मिळवलं, त्यांनी पुणेकरांचेच जीव घेतले, मुरलीधर मोहोळ यांचा गंभीर आरोप

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा