Pune-Mumbai Expressway | अपघातात कारचे नुकसान सहन न झाल्यानं चालकानं पेटवलं समोरचं वाहन ; नेमकं काय घडलं?

आज पहाटेच्या सुमारास भेंडे आडनावाचा कार चालक मुंबईवरून पुण्याला येत होता. लोणावळ्याला जवळ आल्यानंतर त्यांची धडक माश्यांची वाहतूक पुढच्या छोटा हत्तीला लागली. या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनेमुळे चिडलेल्या कार चालकाने टेम्पो चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याच रागातून भेंडे नावाच्या कार चालकाने छोटा हत्ती पेटवून दिला.

Pune-Mumbai Expressway | अपघातात कारचे नुकसान सहन न झाल्यानं चालकानं पेटवलं समोरचं वाहन ; नेमकं काय घडलं?
Pune-Mumbai Expressway accident Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 1:08 PM

लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway)अपघात हे नित्याचे झाले आहे. गेल्या अनेकदा दिवसांपासून सुरु असलेली ही अपघाताची मालिका अद्यापही थांबलेली नाही. सातत्याने होणारे अपघात (Accident) थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही आंदोलनही केलं. मात्र अद्यापही वाहतूक कोंडीची (Traffic jams) व अपघाताच्या मालिकेचा तिढा सुटलेला नाही. यातूनच अनेकदा प्रवाश्यांचे एकमेकांवतर हमरातुमरीवर येण्याचे अनेक प्रसंगही घडले आहे. अश्यातच धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कार व माश्यांची वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोची धडक झाली. या धडकेत कारचे नुकसान झाले. या घटनेने मुळे रागावलेल्या कार चालकाने थेट टेम्पो पटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याघटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र टेम्पो जाळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली.

अशी घडली घटना

आज पहाटेच्या सुमारास भेंडे आडनावाचा कार चालक मुंबईवरून पुण्याला येत होता. लोणावळ्याला जवळ आल्यानंतर त्यांची धडक माश्यांची वाहतूक पुढच्या छोटा हत्तीला लागली. या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनेमुळे चिडलेल्या कार चालकाने टेम्पो चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याच रागातून भेंडे नावाच्या कार चालकाने छोटा हत्ती पेटवून दिला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण छोटा हत्ती जळून खाक झाला. काहीकाळ पुण्याकडे येणारी वाहतूक विस्कळीत होती. ती आता पूर्ववत झालेली आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योग्य उपाययोजनांची आवश्यकता

काही दिवसांपूर्वी केळीची वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाल्याने सर्व केळी रस्त्यावर पसरली होती. त्यामुळे महामार्गावरील इतर वाहने ही घसरल्याची घटना घडली होती . यावेळीही पोलिसांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेत रस्ता साफ करता वाहतूक सुरळीत केली होती. सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी योग्य ती पावले शासने उचलावीत. महामार्गावर आवश्यक ते वाहतू बदल करावेत अशी मागणी लोणावळा व परिसरातील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहेत.

वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!

‘ओला’ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर कट्टा, बॉटनिकल गार्डनसाठी शोधताहेत फूलं!

Non Stop LIVE Update
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.