साखरेच्या हाराला आता महागाईची ‘चव’; सोलापुरात होते निर्मिती, होलसेल भाव ‘एवढा’ असणार

| Updated on: Mar 19, 2022 | 7:20 PM

महागाई आणि इंधनाच्या दरवाढीमुळे (Price increase) यंदाच्या वर्षी साखरेच्या हारांच्या किंमतीत वाढ झाली आहे. साखरेच्या हारांचे होलसेल भाव शंभर रूपये किलो तर किरकोळ भाव दीडेशे ते दोनशे रूपयांपर्यंत गेले आहेत.

साखरेच्या हाराला आता महागाईची चव; सोलापुरात होते निर्मिती, होलसेल भाव एवढा असणार
sakhar Har
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर: चैत्रातील गुढीपाडव्याला साखरेच्या हराचे महत्त्व अधिक असते. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढी पाडव्याच्या सनानिमित्त सोलापुरातील (Solapur) साखरेचा हार करणाऱ्या कारखानदारांची चांगलीच लगबग पाहायला मिळतेय. मात्र यंदाच्या वर्षी हे साखरेचे हार महागणार असल्याची माहिती साखरहार (Sakhar Har) कारखानदारांनी दिली आहे. महागाई आणि इंधनाच्या दरवाढीमुळे (Price increase) यंदाच्या वर्षी साखरेच्या हारांच्या किंमतीत वाढ झाली आहे. साखरेच्या हारांचे होलसेल भाव शंभर रूपये किलो तर किरकोळ भाव दीडेशे ते दोनशे रूपयांपर्यंत गेले आहेत.

सध्या महागाईमुळे दळणवळणाचा खर्च वाढल्याने ही भाववाढ झाल्याचेही कारखानदार सांगत आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याचा हा गोड सण साजरा करत असताना नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलाच चाप बसणार आहे.
गुढीपाडवा हा भारतीयांचा एक महत्वाचा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण हिंदू नववर्ष म्हणूनही साजरा केला जातो.

शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे गुढीपाडव्यादिवशी साखरेच्या हाराचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

तिसरी पिढी साखर हार करण्यात मग्न

दरम्यान सोलापुरातील दोन-तीन पिढ्यांपासून या साखरेचे हार तयार करण्यात येत आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी साखरेच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने हारांची किंमत यंदाच्या वर्षी वाढणार असल्याची माहिती ऋतूराज सिद्धे या कारखानदाराने दिली आहे. यंदाच्या वर्षी ठोक भावात साडेसात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतके दर पाहायला मिळत आहेत. तर किरकोळ भाव प्रतिकिलो दिडशे ते दोनशे रूपये भाव आहेत. विशेष म्हणजे या साखरेच्या हारांना सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र, तेलंगना आदी राज्यातून मागणी असल्याचेही यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान सध्या साखर हार तयार करण्याचे काम जोमात सुरू असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पहायला मिळत आहे.

हाराला मोठ्याप्रमाणात मागणी

महाशिवरात्रीपासून या साखर हारा निर्मितीला सुरूवात होते. त्यानंतर महिनाभर म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत याची निर्मिती सुरू असते. कोरोनामुळे मागील दोन वर्षात नागरिकांना सण साजरा करता आला नाही. मात्र प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध आता कमी केले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून हाराला मोठ्याप्रमाणात मागणी येत आहे. त्यामुळे आम्ही मोठ्याप्रमाणात साखर हारांच्या निर्मितीचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या 

‘आमचा एक जरी आमदार फुटला तर…’, महाविकास आघाडीच्या आमदारांना जयंत पाटलांचा इशारा!

आमच्या संपर्कात भाजपचे 50 आमदार, संजय राऊतांचा प्रतिदावा, तर सत्तारांचंही मोठं विधान

Nanded Death : पोहण्याकरीता गेलेल्या दोन तरूणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून करूण अंत