5

‘आमचा एक जरी आमदार फुटला तर…’, महाविकास आघाडीच्या आमदारांना जयंत पाटलांचा इशारा!

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिलीय. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना एकप्रकारे इशारा दिलाय!

'आमचा एक जरी आमदार फुटला तर...', महाविकास आघाडीच्या आमदारांना जयंत पाटलांचा इशारा!
जयंत पाटील यांचा महाविकास आघाडीच्या नाराज आमदारांना इशाराImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 6:17 PM

मुंबई : राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमधील राजकारण दिवसेंदिवस अधिक रंगताना पाहायला मिळत आहे. नागपुरातील भाषणात देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तर ‘गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असं म्हणत महाविकास आघाडीला एकप्रकारे इशाराच दिलाय. अशावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिलीय. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना एकप्रकारे इशारा दिलाय!

‘आमचे आमदार फुटणार नाहीत. जर कुणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. लोकंच त्यांना सळो की पळो करुन सोडतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या आमदाराविरोधात लढू’, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना इशारा दिला आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. फडणवीसांच्या काळातही एवढा निधी मिळाला नसल्याचं भाजपचे आमदार आम्हाला सांगतात, असा दावाही जयंत पाटील यांनी केलाय.

‘MIMने भाजपविरोध कृतीत दाखवावा’

एमआयएमच्या मुद्द्यावरही जयंत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. एमआयएम समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे. उत्तर प्रदेशात सपाचा पराभव झाला. 86 मतदारसंघात दोन हजार मतांनी एमआयएमचा पराभव झाला. तिथे एमआयएमने पाच हजार मते घेतली. एमआयएममुळे हा पराभव झाला आहे. त्यांनी भाजपला मदत केली हेच स्पष्ट होत आहे. भाजप वेगवेगळ्या समाजाला उभं करून मते फोडण्याची खेळी करत असतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या समविचारी मतात फूट पडते. त्याचा विरोधी पक्षाला फटका बसतो. म्हणूनच भाजपच्या पराभवात एमआयएमला रस असेल तर त्यांनी कृती दाखवली पाहिजे, असं आव्हानच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

सत्तारांचाही महाविकास आघाडीच्या आमदारांबाबत मोठा दावा

महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी खुली ऑफर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आघाडीतील आमदारांना दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीमध्ये एकही आमदार नाराज नाही. केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी असं का बोलावं हे त्यांनाच माहीत. ते पुड्या सोडण्याचे काम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे, अशी टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलीय.

इतर बातम्या :

बीडचा बिहार झालाय हे आमदारांनी विधानसभेत सांगितलं, Pankaja Munde यांच्याकडून समाचार

जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, 14व्या शिखर संमेलनातही सहभाग घेणार

Non Stop LIVE Update
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'