Video : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात फळांचा गाडा धावला, सोलापूरात पावसाची दमदार हजेरी

| Updated on: Jun 01, 2022 | 2:46 PM

महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व पाऊस अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या अनेकांना दिलासा मिळत आहेत. त्याचबरोबर बार्शी तालुक्यात काल जोरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्याचवेळी एक फळांनी भरलेला गाडा भर रस्त्यात मालकाविनाच धावू लागला.

Video : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात फळांचा गाडा धावला, सोलापूरात पावसाची दमदार हजेरी
फळांचा गाडा धावला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर – वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाच्या घडलेल्या घटना आपण अनेकदा मोबाईच्या (Mobile) माध्यातून किंवा अन्य माध्यमातून पाहत असतो. त्यावेळी अनेक वेगवेगळ्या घटना पाहायल्या मिळतात. बऱ्याचदा पावसाळ्यात अनेकदा झाडे कोसळतात, छत्र्या वादळी वाऱ्यासह उडून जाणे असे व्हिडीओ येतात. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात एक अनोखं दृष्य पहायला मिळालं. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात बार्शी शहरातील पांडे चौक परिसरात एक फळांनी भरलेला गाडा भररस्त्यात मालकाविनाच धावू लागला. पुढे जाऊन हा फळाचा गाडा एका चारचाकी वाहनाला धडकला त्यामुळे तो जागेवर थांबला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं व्हिडीओत काय आहे

महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व पाऊस अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या अनेकांना दिलासा मिळत आहेत. त्याचबरोबर बार्शी तालुक्यात काल जोरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्याचवेळी एक फळांनी भरलेला गाडा भर रस्त्यात मालकाविनाच धावू लागला. काही वेळ तो गाडा पुढे गेल्यानंतर एका गाडीला धडकला. तिथं थांबल्यानंतर संबंधित मालकाने तो गाडा ताब्यात घेतला. व्हिडीओ जोरदार पाऊस आणि वादळी वारा सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

भंडारा जिल्ह्यात पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी

भंडारा जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसानी हजेरी लावली आहे. दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होता. तर आज सकाळ पासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी सकाळी प्रचंड उन्हं होतं, तर दुपारच्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला. काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. साधारण अर्धातास चांगला पाऊस झाला.