सोलापूरचा सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी दोन हात करताना रामेश्वर काकडेंना वीरमरण

सोलापूरचा जवान छत्तीसगडमधील रायपूर येथे शहीद झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना रायपूरमध्ये जवानाला वीरमरण आले.

सोलापूरचा सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी दोन हात करताना रामेश्वर काकडेंना वीरमरण
सोलापूरचा जवान शहीद
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 9:17 AM

सोलापूर : सोलापूरचा जवान छत्तीसगडमध्ये शहीद (Martyr) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चकमकीत दोन हात करताना जवानाला वीरमरण आले. रामेश्वर काकडे (Rameshwar Kakade) असे शहीद जवानाचे नाव आहे. शहीद काकडे हे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे मूळ रहिवासी होते. छत्तीसगड येथील रायपूर येथे झालेल्या चकमकीत काकडे यांना वीरमरण आले. शहीद रामेश्वर काकडे बीएसएफमध्ये कार्यरत होते.  दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी त्यांना गोळी लागली होती. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी बुधवारी समोर आली.

सोलापूरचा जवान छत्तीसगडमधील रायपूर येथे शहीद झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवानाला वीरमरण आले.

शहीद रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे मूळ रहिवासी होते. शहीद रामेश्वर काकडे बीएसएफमध्ये कार्यरत होते.

दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी त्यांना गोळी लागली होती. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी बुधवारी समोर आली.

संबंधित बातम्या :

आधी भ्याड हल्ला, मग भारतीय जवानांची हत्यारंही पळवली, नक्षलवाद्यांच्या प्रेस नोटमध्ये काय मागण्या?

 शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्काराला जनसागर, अमर रहेच्या घोषणा

सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमित चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर