Viral Video : राजकीय नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल, सोलापूरमध्ये खळबळ

Viral Video : या व्हिडिओत ही महिला आणि श्रीकांत देशमुख दोघेच दिसत आहेत. हॉटेल किंवा घरातील हा व्हिडिओ असावा. देशमुख हे बनियानवर बेडवर बसलेले आहेत. तर ही महिला व्हिडीओ शुटींग करताना रडताना दिसत आहे.

Viral Video : राजकीय नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल, सोलापूरमध्ये खळबळ
महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा अखेर राजीनामा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 8:42 PM

सोलापूर: सोलापूरच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (shrikant deshmukh) यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोलापूरच्या (solapur) राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत महिलेने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी आपल्याशी संबंध ठेवून आता आपल्याला धोका दिल्याचं म्हटलं आहे. ही महिला रडत रडतच हे सांगत आहे. या व्हिडीओत देशमुखही दिसत असून त्यांच्याकडे बोट करून ही महिला हे सांगत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. भाजप नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन देशमुख यांच्याकडे विचारणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, देशमुख यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, राजीनामा का देत आहे, त्याचं कारण या राजीनामा पत्रात नाही.

 

या व्हिडिओत ही महिला आणि श्रीकांत देशमुख दोघेच दिसत आहेत. हॉटेल किंवा घरातील हा व्हिडिओ असावा. देशमुख हे बनियानवर बेडवर बसलेले आहेत. तर ही महिला व्हिडीओ शुटींग करताना रडताना दिसत आहे. 28 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण व्हिडीओत दोन वेळा हे संभाषण दाखवण्यात आलं आहे. ही महिला रडत रडत तिच्यावरील अन्यायाची माहिती देत असताना देशमुख जागेवरून उठताना आणि या महिलेकडून कॅमेरा हिसकावून घेताना दिसत आहेत. त्यामुळे कॅमेरा हलला आहे. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली दिसत आहे.

महिला काय म्हणाली?

मला हा माणूस… (बोट दाखवत) याने मला फसवलंय. हा श्रीकांत देशमुख आहे. त्याने बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय हा. लग्न करतोय हा… (तेवढ्यात देशमुख जागेवरून उठले आणि त्यांनी शुटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला) नाही… सोड सोड… तू आता बोलायचं नाही…सोड… आता बोलायचं नाही… तू माझ्याशी का खोटं बोलला? का खोटं बोललास…, असं म्हणताना ही महिला दिसत आहे.

विक्रम देशमुखांकडे तात्पुरता पदभार

भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.