प्रणिती शिंदे यांचं राम सातपुतेंना आव्हान; म्हणाल्या, हिंमत असेल तर…

Praniti Shinde on Ram Satpute : लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. अशात सोलापूर लोकसभेत दोन तरूण उमेदवार आमने-सामने आले आहेत. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. वाचा...

प्रणिती शिंदे यांचं राम सातपुतेंना आव्हान; म्हणाल्या, हिंमत असेल तर...
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 3:45 PM

सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. भाजपने 10 वर्षे सोलापुरकरांचा विश्वासघात केला. पण तरीही भाजपने लोकांचा विश्वासघात केला. काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती. पण शिवसेना आमच्यासोबत आली आहे. आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचं आहे. त्यांच्या विचारधारेविरोधात लढायचं आहे, असं प्रणिती म्हणाल्या. भाजपचे आमदार आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्यावरही प्रणिती शिंदे यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे.

राम सातपुतेंना आव्हान

भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर प्रणिती यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या संघर्षाचे सांगता. मात्र बाहेरच्यांनी येऊन आम्हाला पावती द्यायची गरज नाही. तुम्ही कोण लागून गेलात माझ्या वडिलांचा अपमान करायला? मी उमेदवार आहे. माझ्यावर बोला, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

राम सातपुते हे आपल्या खोट्या गरीबीचा दाखला देत म्हणत फिरतात ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वहीं राजा बनेगा’ मग सोलापुरात केलेल्या लोक हिताच्या कामांबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते…, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यावर टीका करा- प्रणिती

आपला एकच शत्रू आहे तो म्हणजे भाजप… बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे साहेबांचे संबंध जुने आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी आमची आई शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे भाषण ऐकायला जायचो. विरोधक सुशीलकुमार शिंदेसाहेब, शरद पवारसाहेब यांच्यावर टीका करत आहेत. मी उमेदवार आहे माझ्यावर टीका करा. माझ्या वडिलावर कशाला टीका करता? हिंमत असेल तर माझ्याशी लढा…, असं आव्हान प्रणिती यांनी दिलं आहे.

“विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली”

आज मी आणि सुप्रिया ताई लढत आहोत, भिडत आहोत. या संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात आणि आमचे दोघींचे वडील वणवण फिरत आहेत. पक्षासाठी फिरत आहेत. माझ्या वडिलांवर का टिका करता? माझ्यावर टिका करा ना… तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे. मला भिडा ना… पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. तुमच्या, एवढा संघर्ष माझ्या वडीलांनी केला. त्याना बोलताना काहीच वाटत नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?.
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक.
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु.