AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या कुटुंबाबद्दल रोहित पवार यांचे मोठे भाष्य, म्हणाले, त्यांच्या परीने…

अजित पवार यांच्या निधनाने मोठा धक्का राज्याला बसला. मात्र, आता त्यांच्या विमान अपघातानंतर मोठा संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार गंभीर आरोप करत असून त्यांनी आता थेट आक्रमक भूमिका घेतली.

अजित पवार यांच्या कुटुंबाबद्दल रोहित पवार यांचे मोठे भाष्य, म्हणाले, त्यांच्या परीने...
Rohit Pawar
| Updated on: Feb 26, 2026 | 1:29 PM
Share

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार 8.10 ला मुंबईहून VSR कंपनीच्या विमानाने बारामतीकडे निघाले. मात्र, 8.45 ला त्यांच्या विमानाची भीषण अपघात बारामती विमानतळाच्या शेजारी झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओही पुढे आली. व्हिडीओ पुढे आल्यानंतरच स्पष्ट झाले की, हा अत्यंत भीषण अपघात आहे. अजित पवार यांच्यासह विमानातील कोणीही वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्ण पवार कुटुंब एकत्र आले. मात्र, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुंबई गाठत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत, याबाबतची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आणि त्यावेळीच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. यादरम्यानच आता आमदार रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी काही गंभीर आरोप केली.

रोहित पवार काल मुंबईतील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याच्या संदर्भात पोहोचले होते. मात्र, तिथे एफआयआर नोंदवून घेतली नाही. आज ते बारामती पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, अजूनही तिथे त्यांची एफआयआर नोंदवून घेतली नाही. यादरम्यानच रोहित पवार यांनी काही आरोप केली असून अजित पवार यांच्या अपघातानंतर एफआयआर का नोंदवून घेतली जात नसल्याचा प्रश्न उपस्थित केला.

रोहित पवार यांनी म्हटले की, मी किंवा त्यांच्या पक्षातील नेते आपल्या स्तरावर लढत आहेत. दादांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एखादा व्यक्ती योग्य लढत असेल पवार साहेबांचा त्याला पाठिंबा असतो. एकनाथ शिंदे यांचे खासदारही याबाबत आवाज उठवतील. अजितदादादांचे कुटुंबीय त्यांच्यापरीने लढत आहे. सुनेत्रा वहिणीही लढत आहेत. सीआयडी  प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे अनुभवी नेते आहेत.

त्यांनी आमच्यासोबत लढा दिला असता तर आम्हाला बरे वाटले असते. मात्र, त्यांचे दोनच खासदार आहेत आमचे जास्त खासदार आहेत. उद्धव ठाकरेंचे खासदार, आपचे खासदार याबाबत लोकसभेत आवाज उठवतील.  त्यामुळे केंद्रीय उड्डाणमंत्री यांचा राजीनामा झाला पाहिजे. तो व्हायलाच हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, जय पवार यानेही ब्लॅक बॉक्सवर शंका उपस्थित केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...