रक्ताची नाती तुटत नाही…अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्याचा श्रीनिवास पवार यांना सल्ला

| Updated on: Mar 19, 2024 | 11:13 AM

Ajit Pawar and Shrinivas Pawar: अजितदादांचे बरेचसे नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. तुम्हाला अजित दांदाना विरोध करायचे असले तर जरुर करा. पण विरोध करताना भाषेवर नियंत्रण ठेवा. आज राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिला तरी तुमची रक्ताची नाती तुटत नाही.

रक्ताची नाती तुटत नाही...अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्याचा श्रीनिवास पवार यांना सल्ला
Ajit Pawar and Shrinivas Pawar
Follow us on

नाशिक | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार कुटुंबामधील लढतीची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. या लढतीमध्ये अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर तुफान हल्ला केला होता. त्यांनी काटेवाडीत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मार्मिक उत्तर दिले आहे. त्यांनी एका आर्थाने श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे. रक्ताची नाती कधी तुटत नाही, विरोध करा, पण बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.

काय म्हणाले भुजबळ

अजितदादांचे बरेचसे नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. तुम्हाला अजित दांदाना विरोध करायचे असले तर जरुर करा. पण विरोध करताना भाषेवर नियंत्रण ठेवा. आज राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिला तरी तुमची रक्ताची नाती तुटत नाही. आज ना उद्या तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र यावे लागणार आहे. एखाद्या कार्यक्रमास तुम्ही सर्व एकत्र याल. एकमेकांचे तोंड पाहाल. ही रक्ताची नाती तुटत नाही, हे लक्षात ठेवा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

राज-उद्धव यांचे दिले उदाहरण

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे भांडण आहे. दोघांचे पक्ष आणि विचार वेगळे आहेत. परंतु दोघांना काही अडचण निर्माण झाली तर ते एकमेकांसाठी धावून जातात, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. यामुळे ही रक्ताची नाती लक्षात ठेऊन राजकारण केले पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले. लोकांसाठी सकाळपासून कोण धावत आहे. हे सर्व लोक पाहत आहेत. लोक कामे असली म्हणजे कोणाकडे जातात, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

रोहित पवार यांना दिले उत्तर

आमदार रोहित पवार यांनी राज्यातील एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे, असे वक्तव्य सोमवारी केले होते. तो मंत्री कृषी विभागाशी निगडीत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलतान भुजबळ म्हणाले की, एका मंत्र्यांने १६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता. तो मंत्री म्हणजे मी आहे. अंबड येथे ओबीसी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. तुमचे ओबीसीचे विचार मांडण्याचे तुम्हाला स्वातंत्र आहे, असे त्यांनी सांगितले होते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.