Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Bus Accident : नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात

ST Bus Accident : नांदेड – लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात

| Updated on: Mar 07, 2025 | 10:57 PM

ST Bus Accident On Nandgaon Pati Road : नांदेड - लातूर महामार्गावर नांदगाव पाटी येथे टोलनाक्याआधी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. 42 प्रवाशांना घेऊन ही बस अहमदपूरकडून लातूरला जात होती.

नांदेड ते लातूर महामार्गावर नांदगाव पाटी जवळ एसटी बस उलटली आहे. या अपघातात 36 प्रवासी जखमी झाले असून 6 प्रवासी गंभीर आहेत. अहमदपूरकडून लातूरकडे ही एसटी बस जात होती.

नांदगाव पाटी येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं. यात 42 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्यातला हा दूसरा अपघात आहे. अशाच एका अपघातात एका दुचाकीस्वाराने आपला जीव काही दिवसांपूर्वी गमावला होता. नांदगाव पाटी हे आता अपघातस्थळ बनत चाललं आहे. आजच्या अपघातात सुदैवाने कोणीही दगावलं नसलं तरी 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत.

Published on: Mar 03, 2025 05:49 PM