AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, अमित ठाकरेंचा हल्लाबोल

मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे, ते पुण्यात बोलत होते.

मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, अमित ठाकरेंचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2025 | 9:55 PM
Share

मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यातील कोंढवा भागात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. , “जे लोकं मुलींवर हात उचलतील त्यांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजेत कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. हे राज्य असं नाही की कोणीही मुलींवर हात टाकू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत महाविद्यालयात पाठवत असाल पण एक लक्षात ठेवा आपली जरी सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत, त्यामुळे तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला घाबरू नका, असं यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे? 

मला खर तर विद्यार्थी सेनेचे खूप आभार मानायचे आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचं माझं स्वप्न तुम्ही साकार करत आहात, विद्यार्थ्यांशी बोलायला मी फार लहान आहे. मला वाटतं शाळेत जाणार प्रत्येक मुल, मुलगा किंवा मुलगी सुरक्षित असावेत.  काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आम्ही तुमच्यासोबत आहोतच,  माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे, असं यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. “जे लोकं मुलींवर हात उचलतील त्यांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजेत, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. हे राज्य असं नाही की कोणीही मुलींवर हात टाकू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत महाविद्यालयात पाठवत असाल पण एक लक्षात ठेवा आपली जरी सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत. मी पालकांशी बोलायला आलो आहे. की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत.” असं यावेळी अमित ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था