AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजप नेत्याचंच वक्तव्य! महाराष्ट्रात खळबळ

त्यामुळे पंढरपूरात सुब्रमण्यम स्वामी विरोधात देवेंद्र फडणवीस असा सामना रंगणार असं चित्र आहे.

शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजप नेत्याचंच वक्तव्य! महाराष्ट्रात खळबळ
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 24, 2022 | 3:22 PM
Share

पंढरपूरः महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस ( Shinde- Fadanvis) सरकार अनैतिक आहे. पक्ष तोड-फोड करून हे सरकार सत्तेत आलंय, असं वक्तव्य भाजपच्याच (BJP) नेत्याने केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanyam Swami) आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात भूमिका मांडली आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘तोडके बनायी है…. निवडणूक लढवून नाही बनवली. आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही. हरयाणात एकदा शंभर टक्के इंदिरा काँग्रेस झाली होती. हा जोक मी पाहिला आहे. त्यावर लोक हसत होते. त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी झाली होती. आता आमचीही बदनामी झाली आहे.

सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती… असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

पंढरपूर कॉरिडॉविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘ पंढरपूरचे लोक मला मुंबईत येऊन भेटले होते. हा मोठा विषय आहे. कोर्टात सबडिसमिस झाला आहे.

त्यानंतर मी त्यांच्याकडून कोर्टातील कागदपत्रं मागवली होती. यासंदर्भातली कागदपत्रं मी वाचली असून त्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलो आहे.

पंढरपूर कोरिडोअरची गरज काय. इथे लोक वाहनांनी येत आहे. रस्ते खराब आहे. ते आधी करावं ना. पंढरपूर कॉरिडोअरची एवढी आवश्यकता का पडली. विमानतळ बनवा. लोक येतील. त्यामुळे व्यवसाय वाढेल. त्यानंतर लोकं स्वत: पंढरपूर चांगलं बनेल.

नव्या कॉरिडोअरसाठी मंदिरं तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी लोकांना नोटिसा आल्या आहेत. हे सरकार चुकीचं करत आहे. कोर्टात हे टिकणार नाही, असा इशारा स्वामी यांनी दिलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर कॉरिडोअरसाठी आग्रही आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडोअर होणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. फडणवीस जास्त बोलले तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिलाय.

त्यामुळे पंढरपूरात सुब्रमण्यम स्वामी विरोधात देवेंद्र फडणवीस असा सामना रंगणार असं चित्र आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.