AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?

सध्या राज्यात साखरेचा भाव प्रचंड वाढला आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा भाव वाढल्याने सामान्यांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, आता शासनाने साखर टंचाई होऊ नये तसेच भाव नियंत्रित राहावा यासाठी सरकारने परिपत्रक जारी केले आहे.

Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ...सामान्यांवर काय परिणाम होणार?
sugar stockImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 7:16 PM
Share

Sugar Price Hike : सध्या राज्यात साखरेचा भाव चांगालाच वाढला आहे. या भाववाढीमुळे सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा हा भाव वधारलाय. बाजारात झालेली ही भाववाढ पाहून सामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातही ही भाववाढ कायम राहिल्यास खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा निर्ण घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक परित्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना काही निर्देश देण्यात आले आहेत. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ विक्री करता येईल, असा साखर साठा करता येणार नाही.

नेमका निर्णय काय झाला?

अन्न नागरी पुरवठा विभागाकडून साखरेच्या साठ्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार विक्रेता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करु शकणार नाही. कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही.

साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  राज्य शासनाचा परवाना धारक रेशन दुकानांना हा नियम लागू नसेल. येत्या 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात हा निर्बंध लागू राहणार आहे.

बुलढाणा, मीरा भाईंदर येथे काय निर्णय झाल?

दिवसेंदिवस साखरेच्या वाढत्या किमती, संभाव्य साखर टंचाईची शक्यता लक्षात घेता बुलढाण्यातील बुलढाणा , खामगाव येथील स्मार्ट बाजार मॉलमध्ये प्रति व्यक्ती एक किंवा दोन किलो साखर दिली जात आहे.. यामुळे मात्र ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण झाल्याने साखर खरेदीसाठी नागरिक धाव घेत आहेत.. स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये प्रति किलो दिली जात आहे,  तर खुल्या बाजारात साखरेची किंमत 70 ते 80 रुपये प्रति किलो आहे. स्मार्ट बाजारात “प्रति व्यक्ती एक किलो साखर” दिली जाणार असल्याचा बोर्ड लावल्याने ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साखरेचे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत यासाठी सरकारचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे साखरेचा भाव कमी कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,