AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?

Sri Lanka vs India, 2nd Test: कोलंबो कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाच्या खात्यात तीन विकेट आल्या आहे. पण त्यातली एक विकेट खास आहे आणि सात दिवसांनी त्या विकेटचं महत्त्वही आहे.

IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं? Image Credit source: PTI
| Updated on: Aug 25, 2026 | 7:06 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत खेळाडूंचं द्वंद्व पाहण्याची संधीही क्रीडाप्रेमींना मिळत आहे. स्लेजिंग असो की त्याला दिलेले प्रत्युत्तर सर्वकाही या मालिकेत घडताना दिसत आहे. असंच काहीसं रवींद्र जडेजाच्या बाबतीत घडलं आहे. श्रीलंकेचा फलंदाज पासिंदु सूर्याबंदारा याची विकेट काढून त्याने आपला राग शांत केला. पासिंदु सूर्याबंदारा कसोटी क्रिकेटमध्ये शतकापासून काही धावा दूर होता. त्याची फलंदाजी पाहून शतक आरामात करेल असं वाटलं होतं. पासिंदु सूर्याबंदारा चांगली फलंदाजी करत होता. पण रवींद्र जडेजाने तसं होऊ दिलं नाही. रवींद्र जडेजाच्या मॅजिक बॉलमुळे त्याचं स्वप्न भंगलं. जडेजाने 45व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पासिंदुला क्लिन बोल्ड केलं. यासह रवींद्र जडेजाने सात दिवसांपूर्वीचा सूड पूर्ण केला. नेमकं काय झालं होतं सात दिवसांपूर्वी असा प्रश्न पडल्याशिवायर राहणार नाही? त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

श्रीलंकेकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला पासिंदु सूर्याबंदारा आक्रमक फलंदाजी करत होता. कसोटी सामन्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. पहिल्या चेंडूवर तंबूत परतावं लागलं होतं. पण कोलंबो कसोटी त्याने आपल्या फलंदाजीची छाप सोडली. 9 चौकार मारत 80 धावांपर्यंत मजल मारली होती. पण शतकाचं स्वप्न रवींद्र जडेजाच्या एका चेंडूमुळे भंगलं. त्याचा चेंडू खेळताना बॅटच्या किनाऱ्याला चेंडू घासला आणि थेट विकेट घेऊन गेला. शतक चुकल्यानंतर पासिंदु सूर्यबंदारा खूपच निराश झाला. पण जडेजा मात्र या विकेटमुळे खूश होता. कारण मागच्या कसोटी सामन्यात पासिंदुने त्याची जबरदस्त झेल पकडला होता. तसेच आक्रमक जल्लोष केला होता.

श्रीलंकन संघ पहिल्या डावात अजूनही 238 धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑन टाळण्यासाठछी श्रीलंकेला 38 धावा कराव्या लागणार आहे. तसेच हातात दोन विकेट आहेत. या सामन्यात सूर्याबंदारानंतर सोनल दिनुषाने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद 85 धावांची खेळी केली. या मालिकेत दिनुषाने सलग तिसरी अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीमुळे जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आणखी 15 धावा करून शतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात 265 धावांवर 8 गडी गमावले आहेत.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे