Sugarcane Fire | पंढरपूरच्या Khardi येथे ऊसाच्या फडाला आग, लाखोंचे नुकसान
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील खर्डी येथे आग (Fire) लागून ऊसाचे (Sugarcane) पीक जळून खाक झाले आहे. आज दुपारी बाळासो माढेकर यांच्यासह दोन शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात महावितरणच्या वीज तारांचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली.
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील खर्डी येथे आग (Fire) लागून ऊसाचे (Sugarcane) पीक जळून खाक झाले आहे. आज दुपारी बाळासो माढेकर यांच्यासह दोन शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात महावितरणच्या वीज तारांचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. यात जवळपास दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. लाखो रुपयांचे यामुळे नुकसान झाल्याची घटना घडलीय. हातातोंडाशी आलेला घास महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हिरावला गेलाय. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. ऊसाच्या पीकाला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. शेतकऱ्यांची यावेळी मोठी धावपळ झाली. दरम्यान, महावितरणमुळेच हे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दहा एकर हे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तत्काळ याची भरपाई करावी, अशी शेतकरी मागणी करत आहेत.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

