अशा चोरांना वाटत असेल पाप फिटेल, मात्र साईबाबा त्यांना योग्य शिक्षा देईल-सुजय विखे

| Updated on: Feb 04, 2022 | 8:33 PM

साई दर्शनाला येणारे भक्त दान पेटीमध्ये जुन्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्या टाकत असल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम थोडी तितकी नाही, तर तब्बल तीन कोटींच्या पुढे आहे, त्यामुळे सर्वच शॉक झाले आहेत.

अशा चोरांना वाटत असेल पाप फिटेल, मात्र साईबाबा त्यांना योग्य शिक्षा देईल-सुजय विखे
Follow us on

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबाच्या दानपेटीत जुन्या नोटा टाकण्याल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नोटबंदीला पाच वर्ष उलटून देखील अद्यापही शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai baba) दानपेटीत जुन्या नोटांचा ओघ सुरूच आहे. साई दर्शनाला येणारे भक्त दान पेटीमध्ये जुन्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्या टाकत असल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम थोडी तितकी नाही, तर तब्बल तीन कोटींच्या पुढे आहे, त्यामुळे सर्वच शॉक झाले आहेत. दरम्यान याबाबत आता काही महिन्यांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक (Reserve Bank) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान आता आरबीआय या नोटांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe patil) यांनी खोचक टीका केली आहे. अशा चोरांना वाटत असेल नोटा दान केल्यावर आपले पाप फिटेल मात्र साईबाबा त्यांनना नक्कीच योग्य शिक्षा देईल अशा शब्दात ते व्यक्त झाले आहे.

सुजय विखे काय म्हणाले?

या नोटांबाबत विचारले असता सुजय विखे म्हणाले, नोटा दान देणारे साईभक्त दोन प्रकारचे असतील, ज्यांनी साठवलेले पैसे सापडले म्हणून देवाला दान केले आणि दुसरे जे चोर आहेत, ज्यांना वाटत असेल देवाला पैसे दिले तर पाप फिटेल. असे दोन वेगळ्या मानसिकतेचे लोक आहेत. चोरांना वाटत असेल पाप फिटेल मात्र साईबाबा त्यांना योग्य शिक्षा देतील, असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या नोटांचं आता काय करायचं असा प्रश्न साई संस्थानापुढे आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहेत.

साई संस्थानाची डोकेदुखी वाढली

साईबाबा संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे नोटबंदीला पाच वर्षे उलटली तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही. आज ही थोड्या फार प्रमाणात या नोटा दानपेटीतील पैशांची मोजदाद करताना आढळून येतात. गेल्या 5 वर्षांत दानपेटीत पडणाऱ्या या नोटांनी साई संस्थानची डोकेदुखी वाढवली आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला असला, तरी अद्याप यावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.

साईबाबांच्या दानपेटीत भक्तांकडून जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा; तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम, साई संस्थांची डोकेदुखी वाढली

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना काहीसा दिलासा, 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

गडचिरोलीत मुलाने केला बापाचा खून; कुऱ्हाडीने सपासप वार करण्याचे कारण काय?