गडचिरोलीत मुलाने केला बापाचा खून; कुऱ्हाडीने सपासप वार करण्याचे कारण काय?

गडचिरोली जिल्ह्यातील विसापुरात काल सायंकाळी अघटित घडले. सख्या मुलानेच वडिलांना कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार केले. खून करून पळून जाणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

गडचिरोलीत मुलाने केला बापाचा खून; कुऱ्हाडीने सपासप वार करण्याचे कारण काय?
गडचिरोलीत खून झालेले घटनास्थळ
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:52 PM

गडचिरोली : शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतर असलेल्या विसापूर खुनाची घटना (Visapur murder case) उघडकीस आली. या गावात घडलेल्या खुनाच्या घटनेत मुलाने बापाचा कुऱ्हाडीने खून (The boy killed his father with an axe) केला. ही घटना काल संध्याकाळी घडली. मृत पावलेल्या इसमाचे नाव दामोदर भिकाजी तांगडे (वय 55) आहे. खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे (वय 24) आहे. आरोपी हा खून करून पळून जाणांच्या प्रयत्नात होता. गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) आरोपीला पकडण्यात यश आले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन गडचिरोलीची टीम घटना स्थळावर दाखल झाली. पंचनामा करून मृत शव हा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मोठा मुलगा पोलिसांच्यात पथकात

मृतक दामोदर यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी 60 या पथकात कार्यरत आहे. लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. तो घरीच राहत होता. त्यामुळं त्याचे वडिलांशी कधीकधी भांडण होत असतं. या वादातून त्याने रागाच्या भरात वडिलांचा खून केला. त्यानंतर तो पळून जाण्याच्या बेतात होता. अशात पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन तासांत आरोपी ताब्यात

दारूच्या नशेत असलेल्या वडिलांसोबत मुलाचा वाद झाला. नेहमींच दारू पिल्यानंतर वडील अभ्रद्र वागतात याचा त्याला अनुभव होता. बरेच वेळा त्याने वडिलांना समजावून सांगितलं होतं. पण, वडील दारू पिल्यानंतर त्याला उलटसुलट बोलायचे. याचा राग मनात धरून लहान मुलाने कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती पोलीस तपास अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. योग्य तपासामुळे आरोपीस अवघ्या दोन तासांत ताब्यात घेण्यात आहे. तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

Nagpur | ताडोबा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; विजय वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक

नागपुरात सात वर्षे कॅन्सरची भीती घेऊन जगली महिला; शस्त्रक्रिया केल्यावर निघाले भलतेय काही!

Nagpur Crime | नागपूरच्या अल्पवयीन मुलीची गुजरातमध्ये विक्री, तिच्यासोबत तिथं नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.