AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, शाब्दिक तोफांमुळे प्रचार रंगात

बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार टक्कर होणार आहे. कारण एकाच घराण्यातील दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवार अर्ज दाखल केला त्याआधी दोघांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, शाब्दिक तोफांमुळे प्रचार रंगात
sule vs sunetra pawar
| Updated on: Apr 18, 2024 | 10:00 PM
Share

Baramati loksabha : बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही प्रतिस्पर्धींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अर्ज भरण्याच्याआधी दोघांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही झालं. सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजय शिवतारे यांच्यासह दिग्गज नेते हजर होते. तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात एकाच मंचावर होते. बारामतीत पवार कुटुंबातच थेट लढत आहे. मात्र अजित पवार यांनी बारामतीची लढाई भावकीची नसून, काही जण भावनिक करत असल्याचा थेट निशाणा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लगावल आहे.

शरद पवारांना टोला

सुनेत्रा पवारांच्या मंचावर, शरद पवारांच्या बाहेरच्या पवार या वक्तव्यावरुनही आवाज घुमला. फडणवीसांनी बारामतीच्या मनामनातील सूनबाई असा उल्लेख केला. तर निलम गोऱ्हेंनी सूनबाईला पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत, असा टोला लगावला.

बारामतीत सुनेत्रा पवारांचा सामना शरद पवारांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंशी आहे. मात्र महायुतीसाठीही बारामतीची लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्ण ताकद लावली आहे.

अजित पवारांवर टीका

इकडे सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांवर शाब्दिक आक्रमण केलं. काही जणांना फोन करुन घाबरवलं जात आहेत. अशांना माझा नंबर द्या, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं आहे. तर अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावरुन चांगलाच समाचार घेतला. सत्तेची एवढी मस्ती आली का ?…निधी तुमच्या खिशातला नाही, असा हल्लाबोल कोल्हेंनी केला आहे.

अमोल कोल्हेंसह जयंत पाटलांनीही अजित पवारांवर तुटून पडण्याची संधी सोडली नाही. द्रौपदीच्या वक्तव्याचा दाखला देत, अजित पवारांचा बॅलेंस जात असल्याचा टोला जयंतरावांनी लगावला.

उमेदवारी अर्ज भरतानाच महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शाब्दिक तोफा धडाडल्यात. बारामतीसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान आहे. त्याआधी प्रचार आणखी रंगात येईल.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.