सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया, आमदारांना काय केलं आवाहन?

Sunetra Pawar : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया, आमदारांना काय केलं आवाहन?
Sunetra Pawar NCP
Image Credit source: Google
| Updated on: Feb 16, 2026 | 10:51 PM

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मंत्रिमंडळात त्यांची जागा घेतली आहे. त्यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाला सर्व आमदारांनी हात वर करून समर्थन दिले असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. यानंतर आमदारांच्या बैठकीत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘अजित दादा आपल्याला सोडून जातील असा आपल्याला कधी वाटल नव्हत पण हे संकट आपल्यासमोर आलं आहे. माझी ईच्छा नाहीये तरी मला आत्ता हे सगळं सांभाळावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या आणि मी तुम्हाला देखील साथ देणार, एकटं सोडणार नाही. आपल्या समोर अनेक संकट आहेत आणि ती सर्व संकट आपल्याला दूर करायची आहेत, मी प्रत्येकाला ताकद देण्याच काम करेन.’

सुनील तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आज साप्ताहिक बैठक, जी दादा आयोजित करायचे ती आज वहिनींच्या उपस्थितीत पार पडली. अर्थसंकल्पात विविध प्रकारची कामे करायची आहेत, यावर चर्चा झाली. झालेल्या निवडणुका यावर चर्चा झाली. दादांनी महाराष्ट्राला गतिमान करण्याचा प्रयत्न केला तसेच पुढच्या काळात काम करण्याचे आश्वासित केले आहे. मागील 2-3 दिवसात प्रशासकीय कामाची चुणूक त्यांनी दाखवली आहे. मंत्रालयातील बैठका त्यांनी घेतल्या. दादा जसे सगळ्या गोष्टी हाताळायच्या तसेच वहिनी हाताळतील.

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, 23 तारखेला शोक सभा आणि 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. विलीनीकरणात्या बाबत आज काही चर्चा झाली नाही. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुशंगाने बैठक झाली. झिरवाळ यांच्या प्रकरणाबाबत काही चर्चा झाली नाही, मात्र मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घातले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us