Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी नवा बॉम्ब फोडला, मोठे गौप्यस्फोट करणार? एका वाक्याने राजकारणात खळबळ, म्हणाले सगळं काही…

विलीनीकरणावर मी कुठेही यूटर्न घेतलेला नाही. मी ‘योग्य वेळी सर्व काही सांगेन’, असं खळबळजनक आणि सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं. मला केव्हा काय बोलायचं ते कळतं, असं बोलून त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्दा आणि त्यावरून केले जाणारे दावे-प्रतिदावे याबाबतचा सस्पेन्स जास्तच वाढवला.

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी नवा बॉम्ब फोडला, मोठे गौप्यस्फोट करणार? एका वाक्याने राजकारणात खळबळ, म्हणाले सगळं काही...
sunil tatkare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 9:26 PM

दिपक दपके, टीव्ही 9 मराठी, रायगड : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आलाय. विलीनकरणाबाबत अजितदादांनी आम्हाला कधीच काही सांगितले नाही, असे म्हणणाऱ्या सुनील तटकरेंनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक दावा केला. अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या. विलीनीकरणावर चर्चा झाली होती, असं थेट तटकरेंनी सांगून टाकलं. या भेटीनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटांत भेटीगाठी चालू झाल्या आहेत. अनेक बड्या नेत्यांनी खासदार शरद पवारांची भेट घेतली. बैठकांचा सपाटा चालू आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर सुनील तटकरेंनी विलीनीकरणाचा मुद्दा संपला आहे, तशी कोणतीही चर्चा नाही, असं सांगून या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता याच सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणावर खळबळ उडवून देणारं विधान केलंय. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलंय.

12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाचा निर्णय झाला असता

सुनील तटकरे यांनी आज रायगडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी त्यांना यावेळी विचारणा करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला आहे, असं स्पष्टपणे तटकरेंनी सांगितलं. तसेच, दादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाचा निर्णय झाला असता, आपल्या या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Loading...

योग्य वेळी सर्व काही सांगेन

तसेच, विलीनीकरणावर मी कुठेही यूटर्न घेतलेला नाही. मी ‘योग्य वेळी सर्व काही सांगेन’, असं खळबळजनक आणि सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं. मला केव्हा काय बोलायचं ते कळतं, असं बोलून त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्दा आणि त्यावरून केले जाणारे दावे-प्रतिदावे याबाबतचा सस्पेन्स जास्तच वाढवला. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात नेमकं काय घडतंय, दोन्ही गटांकडून विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे, असं सांगितलं जातंय. परंतु तटकरेंनी आता केलेल्या विधानामुळे नेमकं काय घडतंय, असं विचारलं जात असून संभ्रम जास्तच वाढलाय. आता आगामी काही दिवसांत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us