सुप्रिया सुळे अन् 8 खासदारांचं सगळं ठरलंय! आता फक्त मोदी, शाहांचं… सुनील तटकरे स्पष्टच बोलले

शरद पवारांनी डिमिलिटेशनवर एनडीने घेतलेल्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. पण आतापर्यंत सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिल्याचीच चर्चा होती, आता सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुप्रिया सुळे अन् 8 खासदारांचं सगळं ठरलंय! आता फक्त मोदी, शाहांचं... सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare Delimitation Statement
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 9:04 PM

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत राजकीय चर्चा सुरू असतानाच खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मोदी आणि अमित शहांचे अभिनंदन करण्याची तयारी असल्याचं त्यानी सांगितलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह 8 खासदारांच्या भूमिकेबाबतही त्यांनी भाष्य केलंय. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रयत्न होत असून, या प्रक्रियेचे आपण स्वागत केले आहे, असे तटकरे म्हणाले. आगामी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading...

1971 मध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लोकसभेच्या 543 जागांची संख्या गोठवण्यात आली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या 35 कोटी होती, तर आज ती 140 कोटींच्या घरात पोहोचली आहे. वाढलेल्या लोकसंख्येनुसार मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रयत्न होत असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे यांच्यासह 8 खासदारांनी या निर्णयाला पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली आहे. एनडीएचा घटक म्हणून आपण या भूमिकेचे स्वागत करत असल्याचेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आणि डीएमकेने भाजपला साथ दिली आहे तर तिकडे समाजवादी पार्टीने राहुल गांधींना साथ दिली आहे.  समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे विधेयक भाजपची सर्वात मोठी चूक असेल, असा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक हातातून निसटत आहे तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेश निवडणूक जिंकण्यासाठी मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा आणले,’ असे अखिलेश म्हणाले. तर, राहुल गांधी यांनी थोड्यावेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतून भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की आपण आणि जेनझीने भाजप व निवडणूक आयोगाला वोटचोरीवरुन घेरले. आता त्यांच्याकडे निवडणुका जिंकण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नव्हता म्हणून त्यांनी आता हा नवा फॉर्मुला शोधून काढला आहे. त्यामुळे डिलिमिटेशन करण्यासाठी भाजप आग्रही आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us