Maharashtra News LIVE : सर्व मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय उपोषण सोडणार नाही – मनोज जरांगे पाटील
Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे दिल्लीतच आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी आहे. आज शिंदेंच्या शिवसेनेकडून कोर्टात युक्तीवाद केला जाणार आहे. ठाकरे गटाचे युक्तीवाद संपला. त्यानंतर शिंदेंच्या युक्तीवादाला सुरूवात होईल. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. आम्हाला चिन्ह देता आले नाही तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, असे शिवसेना ठाकरे गटाने मागच्या युक्तीवादात मागणी केली. त्यासोबतच शिवसेना ठाकरेंचीच असल्याचा दावा केला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या मुद्द्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहेत. दिल्लीत ते मुक्कामी आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. इतरही महत्वाच्या अपडेटसाठी tv9 चा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात ट्रेलरचा अपघात, चालक जखमी
चांदवड (नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात ट्रेलरचा अपघात झाला. पत्र्याचे रोल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा चालकाचा ताबा सुटला. या अपघातात ट्रेलरचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अपघतानंतर ट्रेलरमधील जड पत्र्याचे रोल महामार्गावर विखुरल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
-
चेंबूरमध्ये गुडलक बेकरीचा FSSAI चा परवाना निलंबित
चेंबूरमध्ये गुडलक बेकरीचा FSSAI चा परवाना निलंबित करण्यात आला आहे. स्वच्छता निकषांचं उल्लंघन झाल्याने FDA ने ही कारवाई केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी देखील स्वच्छतेचा अपुऱ्या सुविधा असल्याचं समोर आलं.
-
-
वसमत मध्ये उद्या निघणार 288 आमदारांची प्रतीकात्मक तिरडी यात्रा
हिंगोली- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको व मार्केट बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. आणि वसमतमध्ये 288 आमदारांच्या प्रतिकात्मक तिरडी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.
नागपुर-हैदराबाद महामार्गावर घोळवा पाटी शिवारात रास्ता रोको, तिकडे जिंतूर नांदेड महामार्गावर भेंडेगाव शिवारात ही उद्या रास्ता रोको करणार.
-
छत्रपती संभाजीनगर – वैजापूरजवळ उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 आरोपी जेरबंद
छत्रपती संभाजीनगर – वैजापूरजवळ उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. समृद्धी महामार्गावर वाहन अडवून उद्योजकाची सोन्याची चैन लुटली होती. तीन दिवसांत दिल्ली, नाशिक आणि बीडमधून पाच आरोपी जेरबंद करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले काळ्या रंगाचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलं. – टोळीतील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
-
रद्द केलेली प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार नाहीच – मनोज जरांगे पाटील
द्द केलेली प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार नाहीच. दोन दिवसात रिसल्ट आला पाहिजे . नाही तर पाणी आणि सलाइन बंद करेन . तुमच्या शब्दाला मान देवून पाणी घेतो , पण उपोषण सोडणार नाही – मनोज जरांगे पाटील
-
पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही – मनोज जरांगे यांची ठाम भूमिका
मुंबईत येऊनच यांचा निपटारा करणार. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही – मनोज जरांगे भूमिकेवर ठाम
-
मुंबईत आंदोलन करणारच – मनोज जरांगे ठाम
किमान 4 प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. सातारा, कोल्हापूर गॅझेट 3 महिन्यात लागू करा. ओबीसी समाजाचं 1 टक्काही आरक्षण आम्हाला नको – जरांगे पाटील
-
तुमच्या शब्दाचा मान राखतो , पण उपोषण सोडणार नाही – जरांगे पाटील
तुमच्या शब्दाचा मान राखतो , पण उपोषण सोडणार नाही . मुंबईत येऊनच यांचा निपटारा करणार. किमान 4 प्रमाणपत्रं दिल्याशिवाय मी उपोषणा सोडणार नाही – मनोज जरांगे पाटील
-
उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राचं वाटप व्हायला हवं – मनोज जरांगे
उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राचं वाटप व्हायला हवं. वाटप सुरू होऊ द्या मग बघू – मनोज जरांगे पाटील
-
मराठा आरक्षणावरून महायुती सरकारमध्ये श्रेयवाद – जरांगे पाटील
मराठा आरक्षणावरून महायुती सरकारमध्ये श्रेयवाद. श्रेय शिंदेंनी घ्यायचं की फडणवीसांनी, लढाई सुरू. यात मराठा समाजाचं नुकसान होतंय – मनोज जरांगे पाटील
-
मंत्रालयात मराठा कक्षासाठी कार्यालय देणार – प्रसाद लाड
मागणीनुसार कुणबी-मराठा कक्ष स्थापन केलं. मंत्रालयात मराठा कक्षासाठी कार्यालय देणार. ओबीसी समाजाच्या सवलती मराठा समाजाला मिळणार – प्रसाद लाड
-
शिंदे समिती सर्व राज्याचा दौरा करणार – प्रसाद लाड
शिंदे समिती सर्व राज्याचा दौरा करणार. ओबीसी समाजाच्या सर्व सवलती मराठा समाजाला मिळणार. हैदराबाद गॅझेट रद्द होऊ देणार नाही. राज्यातील 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करणार, पहिलं प्रमाणपत्र मनोजदादांच्या हातून देणार . 17 तारखेपर्यंत सर्व मुद्दे मार्गी लागतील – प्रसाद लाड
-
शिंदे-फडणवीस यांचं सरकार जरांगेंच्या पाठिशी – प्रसाद लाड
जरांगेंच्या सर्व अटी सरकारने मान्य केल्या आहेत. शिंदे-फडणवीस यांचं सरकार जरांगेंच्या पाठिशी आहे – प्रसाद लाड
-
कौशांबी फटाका स्फोटातील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनौरी शहरात 31 ऑगस्ट रोजी एका कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या उर्वशीचा प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मृतांची संख्या 14 झाली आहे.
-
सिक्कीममध्ये आणखी एक मोठे भूस्खलन
दार्जिलिंग: मुसळधार पावसामुळे सिक्कीमला पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावेळी, पश्चिम सिक्कीममधील महत्त्वाच्या रिम्बी-युक्सोम रस्त्यावर विनाशकारी भूस्खलन झाले आहे. डोंगराचा एक मोठा भाग कोसळल्याने रस्ता चिखल, दगड आणि ढिगाऱ्याखाली दबला आहे. परिणामी, त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
-
मनोज जरांगे पाटलांच्या विधानावर विनोद पाटलांचा आक्षेप
छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमच्यावर आहे त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारी अवलाद आमची आहे. भाषा चुकीची वापरली गेली असेल तर ती भाषा चुकीची आहे, असं सांगत विनोद पाटील यांनी मनोज जरांगे यांना फटकारलं आहे. महिला दंडाधिकारी असो किंवा कोणीही महिला असो चुकीचं वक्तव्य करणे योग्य नाही. परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे चार दिवसापासून उपाशी आहेत त्यामुळे थोडी चिडचिड साहजिक आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
-
राम मंदिराचा मुख्य कार्यकारी अधिकारी असणे हे माझे सौभाग्य आहे: जितेंद्र मिश्रा
माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी राम मंदिर ट्रस्टचे सीईओ म्हणून नियुक्ती झाल्यापासून आपले पहिले वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “राम मंदिराचा सीईओ होणे हे माझे सौभाग्य आहे. मी मंदिरासाठी सर्वोत्तम कार्य करण्याचा प्रयत्न करीन. मी ट्रस्टच्या निवड समितीचे आभार मानतो.”
-
अमित ठाकरेंविरोधात FIR, माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर होत नाही- सुप्रिया सुळे
नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अमित ठाकरेंविरोधात एफआयआर होतो, पण माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर होत नाही, अशी टीका त्यांनी केली. दादांचे आमदार, खासदार एफआयआरबाबत एकही शब्द काढत नाहीत असंही सुनावलं.
-
सोन्याचे दर पुन्हा वाढले, चांदी देखील कडाडली
जळगावच्या सराफ बाजारात सहा तासातच सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ
सहा तासांमध्ये सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची तर चांदीच्या दरात सहा हजार रुपयांची वाढ
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 354 रुपये
चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 42 हजार 50 रुपये .
-
स्पा सेंटरच्या नावाखाली नांदेडमध्ये देहव्यापार, सात महिलांची सुटका
मसाजच्या (स्पा सेंटरच्या) नावाखाली देहव्यापार, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेकडून मसाज सेंटरवर धाड,
नेपाळ नागालँड सारख्या परराज्यातील सात पीडित महिलांची सुटका
शहरातील फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार
एलसीबीच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून केली होती खातरजमा
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन गडकरी यांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन गडकरी यांच्या भेटीला
शिंदे दिल्लीतील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल
एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक सुरू
-
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा ठिय्या
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अंकुशनगर परिसरात मराठा आंदोलकांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे येणारी आणि जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून मराठा आंदोलकांची समजूत काढण्यात येत आहे मात्र मराठा समाज बांधव ऐकायला तयार नाही. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.
-
नवी मुंबई : एक्सपायर सलाईन चढवल्याचा आरोप, रुग्णालयात नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात जुलै 2026 मध्ये एक्सपायर झालेले सलाईन रुग्णाला लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 50 वर्षीय गोपीराम खडसे हे उपचारासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांना लावण्यात आलेले सलाईन एक्सपायर असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. एक्सपायरी सलाईनमुळे रुग्णाची प्रकृती अधिक खालावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
-
डिंभे-माणिकडोह बोगद्याला दिलीप वळसे पाटलांचा विरोध
डिंभे-माणिकडोह धरणाच्या बोगद्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाला विरोध कायम ठेवला आहे. डिंभेचा डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालवला तर बोगद्याची गरज नाही, त्यामुळे आधी हा पर्याय तपासावा, अशी त्यांची भूमिका आहे.
-
धाराशिव : उद्या जिल्हा बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा बांधवांकडून उद्या धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी एक दिवस आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांच्या समन्वयकांकडून करण्यात आले आहे.
-
कोर्टातील आजची सुनावणी संपली
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आजही सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
-
तुम्ही पक्षात लोकशाही आणू शकत नसला तर बाहेर काय आणणार- काैल
तुम्ही पक्षात लोकशाही आणू शकत नसला तर बाहेर काय आणणार असा मोठा सवाल कोर्टात काैल यांनी उपस्थित केला.
-
प्रत्येक प्रमुखपदासाठी निवडणूक असेल असे आयोगाने सांगितले होते..
प्रत्येक प्रमुखपदासाठी निवडणूक असेल असे आयोगाने सांगितले होते, पण ठाकरेंनी ऐकले नाही, असे काैल यांनी कोर्टात सांगितले.
-
बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात मोठे बदल झाले- काैल
बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात मोठे बदल झाले. निवडणूक आयोगाचे ऐकले गेले नाही, असे काैल यांनी कोर्टात सांगितले.
-
आयोगाने सांगितलेल्या गोष्टी ठाकरेंनी ऐकल्या नाहीत- काैल
बाळासाहेब ह्यात असताना पक्षात निवडणूका झाल्या होत्या, बाळासाहेब असताना पक्षप्रमुख असतील, असे आयोगाने सांगितले होते, असे काैल यांनी कोर्टात सांगितले.
-
ठाकरे गटाला शिंदेंच्या वकिलांच्या दाव्याने धक्का बसण्याची शक्यता..
आयोगाचे पक्षाने ऐकले नाही तर निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे असल्याचा मोठा दावा शिंदेंचे वकील काैल यांनी केला.
-
निवडणूक आयोगाने सांगितलेल्या गोष्टी ठाकरेंनी केल्या नाहीत- काैल
निवडणूक आयोगाने केलेल्या गोष्टी ठाकरेंनी केल्या नसल्याचे शिंदे गटाचे वकील काैल यांनी म्हटले.
-
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षसंघटनेत बदल झाले- काैल
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षसंघटनेत बदल झाले, असे मोठा दावा काैल यांनी कोर्टात केला.
-
लोकांच्या मताशिवाय पक्षात लोकशाही कशी असेल-काैल
लोकांच्या मताशिवाय पक्षात लोकशाही कशी असेल, चिन्ह देण्याची पद्धत कशी आली हे काैल यांनी कोर्टात सांगितले.
-
पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगच ठरवणार- काैल
पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगच ठरवणार असल्याचे मोठे विधान काैल यांनी केले. यासोबतच ठाकरे वारंवार कोर्टात गेले पण आयोगाकडे कधी आले नसल्याचेही त्यांनी म्हटले.
-
निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुका घ्या निवडणूक आयोगाने सांगितले..
निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुका घ्या, असे वारंवार सांगितले, पण ठाकरेंनी ते ऐकलेच नाही, असे काैल यांनी म्हटले.
-
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल- काैल
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल केल्याचा दावा शिंदेंच्या वकिलांनी कोर्टात केला.
-
चिन्ह देण्याची पद्धत कशी देण्यात आली, हे कोर्टात शिंदेंच्या वकिलांनी सांगितले..
कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांचे काैल यांनी वाचन करण्यास सुरूवात केली. चिन्ह देण्याची पद्धत कशी देण्यात आली, हे कोर्टात शिंदेंच्या वकिलांनी सांगितले.
-
निवडणूक आयोगाने सांगितलेल्या गोष्टी ठाकरेंनी नाहीत- काैल
निवडणूक आयोगाने सांगितलेल्या गोष्टी ठाकरेंनी केल्या नसल्याचे मोठे विधान काैल यांनी कोर्टात केले.
-
पक्षप्रमुख ऐकले नाही म्हणजे नेते चुकले नाही, असे होत नाही- काैल
पक्षप्रमुखांचे ऐकले नाही म्हणजे नेते चुकले असे होत नसल्याचे मोठे विधान कोर्टात शिंदेंचे वकील काैल यांनी केले.
-
ठाकरे वेळोवेळी कोर्टात गेले पण आयोगाकडे नाही- काैल
ठाकरे वेळोवेळी कोर्टात गेले पण आयोगाकडे नाही, असे मोठे विधान शिंदेंच्या वकिलांनी केले.
-
पक्षात लोकशाही असली पाहिजे- काैल
कोणत्याही पक्षात लोकशाही असली पाहिजे आणि देशाच्या संविधानावर त्यांना विश्वास असला पाहिजे, असे मोठे विधान शिंदेंच्या वकिलांनी कोर्टात केले.
-
काैल यांनी शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचे सर्व वाटलाच कोर्टात सांगितली
काैल यांनी शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचे सर्व वाटलाच कोर्टात सांगितली. पक्षांतर्गत निवडणुका घ्या असे सांगूनही ते करण्यात आले नाही.
-
2018 ची घटना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नव्हती- काैल
2018 ची घटना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नव्हती असे मोठे विधान काैल यांनी कोर्टात केले.
-
पक्षांतर्गत निवडणुका घ्या निवडणूक आयोगाने वारंवार म्हटले..
पक्षांतर्गत निवडणुका घ्या असे वारंवार निवडणूक आयोगाने सांगितले असल्याचे काैल यांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटले.
-
ठाकरे गटावर फोडले मोठे खापर
पक्षांतर्गत निवडणूका न घेणे म्हणजे बॉसगिरी असल्याचा मोठा युक्तीवाद कोर्टात काैल यांनी केला.
-
पक्षाच्या संविधानाचा देशाच्या संविधानावर विश्वास असावा- काैल
पक्षाच्या संविधानाचा देशाच्या संविधानावर विश्वास असावा, असे मोठे विधान कोर्टात काैल यांनी शिंदेंची बाजू मांडताना केले.
-
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाचा दाखल काैल यांनी दिला
निवडणुकीत पैशांचा वापर होतो? मग पद घेण्यासाठी नाही का? कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाचा दाखल काैल यांनी दिला.
-
ठाकरे गट म्हणतो की, आयोगाकडे अधिकार काय आहेत?- काैल
ठाकरे गट म्हणतो की, आयोगाकडे अधिकार काय आहेत? हे बदल निवडणूक आयोग कसे मान्य करणार असाही सवाल काैल यांनी कोर्टात केला.
-
ठाकरे वेळोवेळी कोर्टात गेले पण निवडणूक आयोगाकडे नाही- काैल
ठाकरे वेळोवेळी कोर्टात गेले पण निवडणूक आयोगाकडे गेले नसल्याचे मोठे विधान शिंदे गटाचे वकील काैल यांनी केले.
-
बाळासाहेबांनी पक्षातील कारवाईबाबत संविधान सांगितले होते- काैल
बाळासाहेबांनी पक्षातील कारवाईबाबत संविधान सांगितले होते, असे मोठे विधान काैल यांनी कोर्टात केले.
-
निवडणूक आयोगाने रात्री निर्णय घेतला नाही- काैल
कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिंदेंचे वकील काैल यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने रात्री निर्णय घेतला नाही.
-
निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाराचा वापर केला- काैल
निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाराचा वापर केला, असल्याचा मोठा दावा शिंदेंच्या वकिलांनी केला. यासोबतच त्यांनी म्हटले की, व्हिप हा पक्ष विधीमंडळ पक्ष नियुक्त करत असतो.
-
शिंदेंच्या वकिलांचा थेट दावा
निवडणूक आयोग विधीमंडळ, पक्षसंघटना यांच्याशी संवाद करू शकते, 2018 च्या नियुक्तीनुसार, पक्षात अनेकांच्या नियुक्ता करण्यात आल्या.
-
नियुक्ती केलेले अनेक लोक निवडून आलेले नाहीत- धीरज काैल यां
नियुक्ती केलेले अनेक लोक निवडून आले नसल्याचे मोठे विधान शिंदेंचे वकील धीरज काैल यांनी म्हटले.
-
शिंदेंच्या वकिलांचा अत्यंत मोठा दावा…
काही पक्ष हुकूमशाहीसारखे आहेत, त्यात अनेक पक्ष आहेत, असे कोर्टात शिंदेंच्या वकिलांनी म्हटले.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणीला सुरूवात झाली. शिंदे गटाकडून आज युक्तीवाद केला जाईल.
-
पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याचवेळा सुनावणी सुरू होईल. आज शिंदे गटाकडून कोर्टात आपली बाजू मांडली जाईल.
-
रामं मंदिर सीईओच्या नावावर उद्या शिक्का मोर्तब होणार?
राम मंदिर सीईओंच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता… आज यासंदर्भात बैठक… CEO निवड समितीने बंद लिफाफ्यात सादर केली नावं… तिघांची नावं समंदिर ट्रस्टला सुपूर्द
-
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मृत्यूचं प्रकरण. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप. राजकीय दबावाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी. कर्मचाऱ्यांकडून प्रधान सचिवांना मागणीचं थेट पत्र
-
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये चोरांचा सुळसुळाट
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये चोरांचा सुळसुळाट. आदर्शनगर, साईनगर, वृंदावननगर, यशोधाममध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं. परिसरात चोऱ्या वाढल्यानं नागरिकांवर रात्री पहारा देण्याची वेळ
-
MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कोर्टात आणलं
MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कोर्टात आणलं. कोठडी संपल्यामुळे 6 आरोपींना कोर्टात आणलं, आरोपी ऋतुजा पाटीललाही कोर्टात हजर केलं. 6 आरोपींमध्ये एमपीएससीचे 3 अधिकाऱ्यांचा समावेश
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचे शिष्टमंडळ व अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचे शिष्टमंडळ व अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू. बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित. मनोज जरांगे याना काल पाठवण्यात आलेल्या ड्राफ बाबत अजूनही उत्तर आले नाही. पुढील दिशा ठरवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांत बैठक सुरु
-
संभाजीनगरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. बैठकीला मंत्री विखे पाटील, उदय सामंतांसह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत. पुढील दिशा ठरवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे.
-
तुळजापुरात सकल मराठा बांधवांचं बोंब मारो आंदोलन
तुळजापूर इथं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देत सकल मराठा बांधवांच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं. आंदोलनानंतर सकल मराठा बांधवांच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
-
मुंबई महापालिकेत नवा धमाका होण्याची शक्यता
मुंबई महापालिकेत नवा धमाका होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंपाठोपाठ भाजपही ठाकरेंना धक्का देण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील ठाकरे सेनेचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण शहरात मराठा समाजबांधव आक्रमक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण शहरात मराठा समाजबांधव आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून पैठणकडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शाळकरी विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत. तर सकल मराठा समाज बांधवांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. सरकारने आरक्षण द्यावं नाहीतर आम्ही सर्व शालेय विद्यार्थी मुंबईला येऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
-
डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांचं पार्थिव थोड्याच वेळात फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर आणण्यात येणार
फलटणमधील डॉ राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांचं पार्थिव थोड्याच वेळात फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर आणण्यात येणार आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे.
-
मुंबईत महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन
मुंबईत महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेसुद्धा सहभागी झाल्या आहेत. “तेल, डाळी, दूध सगळंच महागलं आहे. मुंबईत काहीच स्वस्त राहिलं नाही. महागाईमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
सोलापुरात शालेय विद्यार्थ्यांसाठी चुलीवरच्या भाकरी बनवण्याची अनोखी स्पर्धा
सोलापुरात शालेय विद्यार्थ्यांसाठी चुलीवरच्या भाकरी बनवण्याची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. शहरातील बाळे परिसरातील आदी जांबमुनी मराठी शाळेत चक्क चुलीवरच्या भाकरी बनवण्याची अनोखी स्पर्धा रंगली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः जळण गोळा करून विटांची चूल तयार केली आणि भाकरी थापली. विशेष म्हणजे मुलींसोबत मुलांनीही या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला.
-
राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ अमरावतीत आंदोलन
राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ काँग्रेसचे अमरावतीत निषेध आंदोलन. तसेच उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे.
-
CBI कडे तपास वर्ग होताच दिशा सालियनच्या वडिलांनी मानले आभार
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. त्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हायकोर्टाचे आभार मानले आहेत. तर वकील निलेश ओझा यांनी प्रतिक्रिया देत सीबीआयचा तपास नकारात्मक वाटला तर आम्हाला प्रोटेस्ट याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल असं देखील म्हटलं आहे.
-
जळगावात साखरेच्या दरवाढीविरोधात समाजवादी पार्टीचे आंदोलन
जळगावात साखरेच्या दरवाढीविरोधात समाजवादी पार्टीचे आंदोलन सुरु आहे. टॉवर चौकात नागरिकांना साखर वाटून सरकारचा निषेध. साखरेचे भाव नियंत्रणात आणण्याची समाजवादी पार्टीची यांची मागणी.
-
सीबीआयचा तपास नकारात्मक वाटला तर प्रोटेस्ट याचिका दाखल करणार- वकील निलेश
दिशा सालियन प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यावर वकील निलेश म्हणाले की, आज उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले आहेत की, सतीश सालियान यांची जबानी नोंदवून त्याआधारे एफआयर नोंदवा. ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावे असतील त्यांच्याविरोधात कारवाई करावी. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा सीबीआयचा तपास नकारात्मक वाटला तर आम्हाला प्रोटेस्ट याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल.
-
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीयकडे, हायकोर्टाचा निर्णय
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा. कोणालाही आरोपी म्हणून वागणून देऊ नये, फक्त जबाब नोंदवा. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा असे हायकोर्टाने म्हटले आहे.
-
रावेर परिसरात मंगळवारी सकाळीच ७वाजून ५७ मिनिटांनी ३. ३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
रावेर परिसरात मंगळवारी सकाळीच ७वाजून ५७ मिनिटांनी ३. ३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने कुठलीही हानी नसल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू २१.३३२ उत्तर अक्षांश आणि ७६.०७१ पूर्व रेखांशावर, जमिनीपासून सुमारे किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाची नोंद झाली आहे, मात्र नागरिकांना तो जाणवला नाही. तसेच कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही.
-
एकीकडे राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे भाजप होणार आक्रमक
एकीकडे राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे भाजप आक्रमक होणार. नारी वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल नाशिक भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणाऱ्या आंदोलनात भाजपच्या प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहे. काँग्रेसने नारी विधेयकाला विरोध केल्याने भाजपकडून काळे कपडे परिधान करून तसेच काळेफिती लावून करण्यात येणार निषेध आंदोलन… काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर असताना भाजपकडून नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन केलं.
-
नाशिक मध्ये राहुल गांधींचा खड्ड्यातून प्रवास
– नाशिक मध्ये राहुल गांधींनी खड्ड्यातून प्रवास केला. नाशिकच्या म्हसरूळ मखमलाबाद परिसरातून ताफा जात असताना खड्ड्यातून प्रवास करावा लागला. नाशिकच्या विमानतळावरून काँग्रेसच्या शिबिराच्या ठिकाणी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधींचा ताफा खड्ड्यातून गेला.
-
मागील तीन आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाचा खंड….
मागील तीन आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. सोयाबीनचे पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड होत आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी द्याव लागत आहे. पाऊसच नसल्याने अनेक भागांमध्ये सोयाबीनच्या पिकाने खाली माना टाकल्या आहेत.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव–औसा रोडवरील चिखली फाटा येथे सकल मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
-
शिवसेनेची ही अंतिम लढाई – संजय राऊत
सुप्रिम कोर्टात सिब्बल यांनी आमची बाजू उत्तम मांडली. आज शिंदे त्यांची बाजू मांडतील, संविधानाच्या चौकटीत त्यांना निर्णय घ्यावा लागणार. शिंदे सतत दिल्ली आणि दरे गावात जात आहेत. शिंदे आज कोर्टात स्वतः युक्तिवाद करणार आहेत का? ‘धनुष्यबाण गोठवण्याची वेळ आणली कोणी? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
-
राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा भरपाई द्या- शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी
राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा भरपाई द्या, शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी. एल निनोच्या प्रभावामुळे सोलापूर जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झालाय. संतप्त शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर रोटर फिरवत पेरलेले पीक काढून टाकले. बार्शी तालुक्यातील वानेवाडी गावातील शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून चालू खरिपातील पिके पावसाअभावी करपू लागलीत. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकावरून शेतकऱ्यांना रोटर फिरवावा लागत आहे. सरकारने तात्काळ विमा कंपन्यांना पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी.
-
एकीकडे राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे भाजप होणार आक्रमक
एकीकडे राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे भाजप होणार आक्रमक. नारी वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल नाशिक भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येणार. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणाऱ्या आंदोलनात भाजपच्या प्रमुख पदाधिकारी होणार सहभागी. काँग्रेसने नारी विधेयकाला विरोध केल्याने भाजपकडून काळे कपडे परिधान करून तसेच काळेफिती लावून करण्यात येणार निषेध आंदोलन. काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर असताना भाजपकडून नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन
-
मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उभी
मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उभी. नाशिकच्या दिशेने जाणारी वंदे भारत माणिकखांब जवळ अर्धा तास उभी. रन ओव्हर झाल्याने गाडी उभी असल्याची रेल्वेच्या अधिकाऱ्यांची माहिती, अर्ध्या तासानंतर गाडी नाशिकच्या दिशेने रवाना
-
जळगाव, रावेरमध्ये ३.३ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
रावेर परिसरात मंगळवारी सकाळीच ७वाजून ५७ मिनिटांनी ३. ३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने कुठलीही हानी नसल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू २१.३३२ उत्तर अक्षांश आणि ७६.०७१ पूर्व रेखांशावर, जमिनीपासून सुमारे किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाची नोंद झाली आहे, मात्र नागरिकांना तो जाणवला नाही. तसेच कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही.
-
महागाई विरोधात पवार गटाचे आंदोलन
महागाई विरोधात पवार गटाचे आंदोलन असणार आहे. या आंदोलनातच सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. हे आंदोलन दुपारी 1.15 वाजता असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर असणार आहे.
-
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामधील तीन बाळांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामधील तीन बाळांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण….दोन बाळांचा मृत्यू भाजल्याने तर एकाचा मृत्यू धुरामुळे गुदमरून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट…किरण बेठेकर यांचे बाळ 75 टक्के भाजल्याने तर गायत्री चोपडे यांचे बाळ 20 टक्के भाजल्याने मृत्यू… व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागल्याने घडली होती दुर्घटना..
-
कापसाबाबत महत्त्वाची बातमी समोर
कापसाला आता दहा हजार क्विंटलपेक्षा जास्त दर मिळणार आहे, कृषी अर्थतज्ञ विजय जावंधिया याची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
-
खासदार लंकेंनी उपोषण सोडलं
खासदार निलेश लंकेंचे अहिल्यानगरातील उपोषण मागे, शिक्षण विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानं उपोषण सोडल्याची माहिती समोर.
-
एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत आज सुनावणी होणार आहे, शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टात आज शिंदेच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे.
-
वैनगंगा नदीवरील पुलावर मृत्यूचा प्रवास
वैनगंगा नदीवरील ९७ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मृत्यूचा प्रवास; नागरिक जीव मुठीत धरून करतायेत आजही प्रवास.
-
राज्यातील आदिवासी विद्यार्थी आणि संघटनांचे शिष्टमंडळ आज राहुल गांधींची भेट घेणार
राज्यातील आदिवासी विद्यार्थी आणि संघटनांचे शिष्टमंडळ आज राहुल गांधींची भेट घेणार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात आंदोलनाचा भडका. नाशिक, पुणे आणि नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन. काही ठिकाणी आंदोलन मागे; मात्र नाशिकमधील आंदोलन अद्याप सुरूच. २० जणांचे शिष्टमंडळ आज राहुल गांधींसोबत करणार चर्चा. नाशिक, पुणे, नागपूरमधील आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी राहणार शिष्टमंडळात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्न राहुल गांधींसमोर मांडणार
-
बीडमध्ये कुणबी नोंद मिळाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी 2 लाख 9872 अर्ज प्राप्त
बीड जिल्ह्यात कुणबी नोंद मिळाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी 2 लाख 9872 अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते त्यापैकी 2 लाख 9851 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्रमाणपत्र वाटपानंतर 13 हजार 754 जणांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केले होते त्यापैकी 11 हजार 422 प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहेत तर काही प्रलंबित आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत.
-
बीड जिल्ह्यात जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान 2 लाख 9851 कुणबी प्रमाणपत्र वाटप, तर 11 हजार 422 प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी
बीड जिल्ह्यात कुणबी नोंद मिळाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी 2 लाख 9872 अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते त्यापैकी 2 लाख 9851 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्रमाणपत्र वाटपानंतर 13 हजार 754 जणांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केले होते त्यापैकी 11 हजार 422 प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहेत तर काही प्रलंबित आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत.
-
कल्याण न्यायालयाच्या कॅन्टीनवर FDA ची धाड
कल्याण न्यायालयाच्या कॅन्टीनवर FDA ची धाड; स्वच्छतागृहाच्या टाकीवर स्वयंपाकघर, वकिलांच्या तक्रारीनंतर उपाहारगृह बंद. स्वच्छतागृहाच्या टाकीवर सिलेंडर ठेवून केले जात होते खाद्यपदार्थ तयार; अस्वच्छ वातावरणात सुरू होती कॅन्टीन. सांडपाण्याची दुर्गंधी, माशांचा त्रास अन् धुळीत खाद्यपदार्थ; वकील संघटनेने FDA कडे तक्रार. वकील संघटनेच्या तक्रारीनंतर FDA ची पाहणी; कॅन्टीन चालकाकडे आवश्यक परवानाही नसल्याचं उघड. FDA कडून धडक कारवाई करत उपाहारगृह बंद; न्यायालयाच्या आवारातील अस्वच्छ कारभारावर अखेर कारवाई.
-
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, वेदना तीव्र झाल्याने घालमेल. तरीही उपचार घेण्यास नकार देत आहेत. मध्यरात्री केलेल्या तपासणीनंतर प्रकृती अधिक खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
-
जळगावच्या शेतकऱ्याने चार एकर कापूस पिकावर फिरवले रोटाव्हेटर
जळगावच्या जामनेर तालुक्यातील होळहवेली तांडा येथील शेतकऱ्याने चार एकर कापूस पिकावर फिरवले रोटाव्हेटर. पावसाने दीड महिन्यापासून दिली हुलकावणी त्यामुळे शेतकऱ्याने चार एकर कापूस केला जमीनदोस्त. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने कापसाची वाढ खुंटली आणि पीक हळूहळू कोमेजू लागले होते. पीक वाचवण्यासाठी पवार यांनी उपलब्ध पाण्यातून बादलीने पाणी देत कापूस जगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही. शेतकरी रमेश पवार यांनी चार एकर क्षेत्रात कापूस पिकावर रोटावेटर फिरवले असून पीक जमीनदोस्त केले आहे
-
जळगावातील शाहूनगर परिसरातील चोरीची घटना उघडकी
पोलिसांकडून तिघांना अटक १२ हजारांची रोकड हस्तगत. दूध विक्रेत्याच्या पँटच्या खिशातील १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी केली होती लंपास. जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा गुन्हे शोध पथकाकडून उलगडा.शहिदखान नजीरखान आणि समीर खान मजीदखान यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला अटक
-
MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात नंदुरबारमधून आणखी एका आरोपीवर गुन्हा दाखल..
ऋतुजा पाटील हिचा नातेवाईक असलेल्या मयूर ठाकरे याच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल…. पेपरफुटी प्रकरणात मयूर ठाकरे याचाही सहभाग असल्याचा मुंबई पोलिसांना संशय….प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांना पेपरफुटीसाठी मयूर ठाकरे याने मदत केल्याचा पोलिसांचा संशय…. मयूर ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नंदुरबारमधून फरार असल्याची माहिती….यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटील, अमृत पाटील, गौरव पाटील आणि MPSC कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाल मराठे हे आरोपी असून नंदुरबारशी निगडित आहेत….
-
एमआयडीसीत गौरी, गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग
कारखान्यातील केमिकल आणि रंगाच्या ज्वलनशील डब्यांमुळे आग झपाट्याने पसरली, ज्यामुळे लाखोंच्या गणेशमूर्ती जळून खाक झाल्या. वाई नगरपालिकेसह परिसरातील अग्निशामक बंबानी सुमारे ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. गणेशोत्सव तोंडावर असताना घडलेल्या या दुर्घटनेत मोठी आर्थिक हानी झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असून नेमकी ही आग कोणत्या कारणातून लागली याचा तपास पोलीस करत आहेत.