Maharashtra Live News : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दुष्काळ दाैऱ्यावर..
Maharashtra Live News : राज्यात दुष्काळाची स्थिती आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दुष्काळ दाैऱ्यावर आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली.

LIVE NEWS & UPDATES
-
एफडीएकडून छापा आणि कारवाई सुरूच निकृष्ट तूप आणि हळदीचा साठा जप्त
पंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केटमधील श्री बालाजी फ्रूट ट्रेडर्सवर छापा. ७५ किलो ‘बातुला’ ब्रँडचे गाईचे तूप जप्त तुपाची किंमत ५७ हजार रुपये. १०० किलो हळद पावडरचा साठा जप्त. हळद पावडरची किंमत २ लाख ४५ हजार रुपये. तूप आणि हळदीसह एकूण ३ लाख १० हजारांचा साठा ताब्यात
-
माणी सेंट्रल किचनच्या भोजनाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांची तक्रार
पळसन आश्रमशाळेत कच्ची पोळी मिळत असल्याचा दावा. वरण-भाजी बेचव; भाताच्या गुणवत्तेवरही केला उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्न. ग्रामस्थांची आश्रमशाळेला अचानक भेट; भोजनाची पाहणी.भोजनाच्या चवीबाबत विद्यार्थ्यांची नाराजी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणेविद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून भोजन तपासणीची मागणी
-
-
नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळाचा अहवाल
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ३३६ महसूली मंडळांपैकी १८ मंडळात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस तर २१ दिवसांचा पावसाचा खंड या निकषानुसार १५० पेक्षा जास्त मंडळात दुष्काळी स्थिती. महसूल आणि कृषी विभागाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान, दुष्काळ जाहिर करण्याची शिफारस
-
अंगणवाडीच्या थकीत बिलांसाठी ३० हजारांची लाच
इचलकरंजीत अंगणवाडीच्या शालेय अन्न पुरवठा योजनेच्या थकीत बिलांना मंजुरी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या 11 अंगणवाड्यांचे मागील सहा महिन्यांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल 33 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेवर पोलिसांचा दणका
गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 20 मंडळांसह डीजे चालक-मालकांवर गुन्हे दाखल, तर साउंड सिस्टीमही जप्त करण्यात आली आहे. 21 सप्टेंबरला झालेल्या कारवाईत सांगवीत 9, तळेगाव दाभाडेत 5, भोसरी एमआयडीसी आणि शिरगावात प्रत्येकी 2, तर तळेगाव एमआयडीसी आणि बावधनमध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल करण्यात आला.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी आहे. शिवसेना शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. दुपारी या सुनावणीला सुरूवात होईल. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर, धाकाशिव, बीडच्या दुष्काळी दाैऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाच्या दुष्काळी दाैऱ्यावर आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही, पावसाने पाठ फिरवली. शेतीचा गंभीर प्रश्न आहे. सरकारकडून दुष्काळाची पाहणी केली जात आहे. राज्यात गणेशोत्सव सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी आयकर विभागाने नोटीस पाठवल्या आहेत, त्यावर बोलताना जरांगे पाटील दिसले.